Sharad Pawar : हर्षवर्धन पाटलांसाठी 'वस्ताद' मैदानात, इंदापूरमध्ये राजकीय घडामोडींना वेग

Sharad pawar meet Bharat Shah : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाला इंदापूरच्या स्थानिक नेत्यांचा विरोध होता.
Sharad pawar meet Bharat Shah
Sharad pawar meet Bharat Shahsarkarnama
Published on
Updated on

Indapur News: इंदापूर मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांच्या उमदेवारीमुळे नाराजी असलेले आप्पासाहेब जगदाळे हे शरद पवारांची साथ सोडणार आहेत. प्रवीण माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. इंदापूरचे माजी नगराध्यक्ष भरत शहा हे देखील हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीमुळे नाराज आहेत. या सगळ्या घडामोडींमुळे हर्षवर्धन पाटील यांचे टेन्शन वाढले होते. मात्र, रविवारी हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी शरद पवार हे मैदानात उतरले.

शरद पवार यांनी आपल्या इंदापूरच्या दौऱ्यात भरत शहा यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीवेळी हर्षवर्धन पाटील आणि त्यांचे पुत्र राजवर्धन हे देखील उपस्थित होते.

शरद पवार यांनी बंद दाराआड भरत शाह आणि त्यांच्या बंधूसोबत चर्चा केली. त्यामुळे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना दिलासा मिळाल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेमध्ये काय ठरले याची माहिती समोर येऊ शकली नाही.

Sharad pawar meet Bharat Shah
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचे अखेर ठरले; 'या' 14 मतदारसंघात लढवणार निवडणूक तर 'या' ठिकाणी पाडण्याची रणनीती

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाला इंदापूरच्या स्थानिक नेत्यांचा विरोध होता. आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने, भरत शहा यांनी थेट हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली होती.

तिरंगी लढत?

आज (सोमवार) उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रवीण माने हे उमेदवारी अर्ज मागे घेणार की नाही हे आज कळणार आहे. अन्यथा इंदापूर विधानसभेत तिरंगी लढत होणार असून हर्षवर्धन पाटील, दतात्रेय भरणे, प्रवीण माने असा सामना होणार आहे.

Sharad pawar meet Bharat Shah
Tanaji Sawant : आरोग्य मंत्र्यांचा सावंत परिवार महायुतीविरोधात निर्णय घेणार? माढ्यासह चार मतदारसंघांवर इफेक्ट होणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com