इंदापूरचे आमदार भरणे हिवाळी अधिवेशनामध्ये सुसाट...

Dattatray-Bharne
Dattatray-Bharne
Published on
Updated on

वालचंदनगर  : नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशामध्ये आमदार भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील जनतेच्या  मागण्यासाठी आक्रमक झाले. त्यांनी अधिवेशामध्ये सात मागण्या मांडल्या . 

यातील काही मागण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले. तर उर्वर्रित मागण्या लवकरच पूर्ण करणार असल्याचे आश्‍वासने देण्यात आली. 
  
नागपूर येथे नुकतेच हिवाळी अधिवेशन पार पडले. या अधिवेशामध्ये भरणे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच आक्रमक झाले होते. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासुन रिक्त असेली 718 पदे भरण्याची मागणी केली.

 आरोग्य विभागामध्ये कर्मचाऱ्या अभावी सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवा देण्यास अनेक अडचणी येत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी यंत्रणा सज्ज असताना ही केवळ कर्मचारी नसल्यामुळे सर्वसाामन्य नागरिकांना खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी जावे लागत आहे. 

तातडीने रिक्त पदे भरण्याची मागणी लावून धरली. अधिवेशन संपताच रिक्त जागा भरण्याची कार्यवाही सुरु होईल असे आरोग्यमंत्र्यानी  सांगितले. 

राज्यामध्ये घरकुल योजनेमध्ये गरींबाना घरकुले मंजूर होत आहेत.मात्र त्यांच्याकडे जागा नसल्याने त्यांना लाभ घेण्यास अडचण येत असल्याने गायरानातील जागा करार पद्धतीने द्यावी.व एक,दोन गुंठे घरकुलासाठी खरेदी केलेल्या जागेची नोंद शासन दरबारी करावी याची मागणी केली. ही मागणी झाल्यास सर्वांना हक्काचे घर मिळेल. 

इंदापूर शहरामध्ये असलेले तालुका न्यायालयाची इमारत जुनी असून जीर्ण झाली आहे. न्यायालयासाठी भव्यदिव्य इमारतीची व पुणे येथे न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याची मागणी भरणे यांनी केली. इंदापूरमधील न्यायालयासाठी पुरेसा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्रांनी केली.

 इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी येथे नीरा नदीवरती पूल बांधल्यास पुणे व सोलापूर जिल्हाला नागरिकांना,शाळेतील मुलांना ये-जा करण्यास सोईस्कर होईल.यामुळे वीस कि.मी चे अंतर वाचून दळणवळण सोईस्कर होण्यासाठी मदत होणार असल्याने या पुलासाठी 16 कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी भरणे यांनी केली. 

तसेच इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेमध्ये नीरा डाव्या कालव्याच्या पाण्याचे आवर्तन मिळावे ,कालव्यात पाणी असून ही नियोजनाअभावी शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com