Uday Samant Video : मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमात उद्योगमंत्र्यांचा फोन हरवला

Uday Samant lost his phone : मेट्रोच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू असताना उद्योगमंत्र्यांचा हरवलेला मोबाईल सापडला तर परत आणून द्या, अशी अनाउंसमेंट करण्यात आली.
Uday Samant
Uday Samant Sarkarnama
Published on
Updated on

Uday Samant News : शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. मात्र, या कार्यक्रमासाठी पुण्यात उपस्थित असलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मोबाईल हरवल्याचे समोर आले. कार्यक्रम सुरू असताना उद्योगमंत्र्यांचा हरवलेला मोबाईल सापडला तर परत आणून द्या, अशी अनाउंसमेंट करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने आज (रविवारी) शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रोचे उद्घाटन तसेच स्वारगेट-कात्रज मेट्रोचे भूमिपूजन देखील पंतप्रधानांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात उपस्थित होते. त्यांनी उद्घाटनानंतर मेट्रोने देखील प्रवास केला.

मात्र, कार्यक्रमाच्या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांचा फोन हरवल्याची अनाऊंसमेंट झाल्याने एकच खळबळ उडाली. ज्यांना मोबाईल सापडला असेल त्यांनी व्यासपीठावर आणून देण्याचे आवाहन देखील अनाऊंसमेंटमध्ये करण्यात आले.

पुण्यात न आल्याची पंतप्रधानांना खंत

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट मार्गिकेचे उद्घाटन गुरुवारी (ता.26) होणार होते. मात्र, मुसळधार पावासाच्या शक्यतेने पंतप्रधानांचा पुणे दौरा रद्द झाला. मात्र आज (रविवारी ) पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या मार्गिकेचे उद्घाटन करण्यात आले.

त्यावेळी पंतप्रधान म्हणाले, विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी आणि उद्घाटनासाठी मला पुण्यात यायचे होते. मात्र मोठ्या पावसामुळे मला कार्यक्रम रद्द करावे लागले, यात माझे नुकसान आहे. कारण पुण्याच्या कणाकणामध्ये राष्ट्र आणि समाजभक्ती आहे. त्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com