बलात्काराचा गुन्हा न नोंदविण्यासाठी लाच घेणाऱ्या महिला PSI ला कृष्णप्रकाशांचा दणका

अशोक बाळकृष्ण देसाई (जमादार) हा, मात्र ACB च्या पथकाला धक्का मारून लाच रक्कमेसह दुचाकीवरून पळून गेला होता.
 Police Commissioner Krishnaprakash
Police Commissioner KrishnaprakashSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या (Pimpri-Chinchwad Police Commissionerate) सांगवी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षक (PSI) हेमा सिद्धराम सोळूंके (वय २८) यांना सत्तर हजार रुपयांची लाच घेताना गुरुवारी (ता.2 डिसेंबर) पकडण्यात आले. तर, त्यांच्यावतीने ही लाच घेणारा याच पोलिस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षक (जमादार) अशोक बाळकृष्ण देसाई हा, मात्र ACB च्या पथकाला धक्का मारून लाच रक्कमेसह दुचाकीवरून पळून गेला होता. या दोघांनाही 24 तासाच्या आत दबंग पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (Police Commissioner Krishaprakash) यांनी शु्क्रवारी (ता.3 डिसेंबर) तडकाफडकी निलंबित (Suspend) केले.

 Police Commissioner Krishnaprakash
वाहनचालकांनो खबरदार... आता हेल्मेट नसेल तर लायसन्स रद्द होणार!

गुन्हे तपासाची चांगली कामगिरी करणाऱ्या पोलिस पथकाला व सबंधित पोलिस ठाणे वा गुन्हे शाखेचा जाहीर सत्कार करून गौरवित आहेत. तसेच, त्यांना वीस आणि पंचवीस हजार रुपयांचे रोख बक्षीस प्रमाणपत्रासहित देण्याचा चांगला पायंडा त्यांनी पाडलेला आहे. त्याचवेळी कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना ते बडगाही दाखवित आहेत. यापूर्वीही त्यांनी चाकण, सांगवी, हिंजवडी व इतर पोलिस ठाण्यातील अशा पोलिस व अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई केलेली आहे. ती पुढे त्यांनी सुरुच ठेवत नेमका संदेश आपल्या पोलिस दलाला दिला आहे.

 Police Commissioner Krishnaprakash
विलास लांडेंचा आमदार लांडगेंना इशारा : अन्यथा तुम्हाला पाणी पाजतील

बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागून सत्तर हजार रुपये सोळूंके व देसाई या दोघांनी घेतले होते. सांगवी पोलिस ठाण्यातच यापूर्वीच्या लाचखोरीत कृष्णप्रकाश यांनी सबंधित लाचखोराला तडकाफडकी निलंबित केले होते. त्यामुळे या दोघांविरुद्ध अशीच कारवाई होण्याची शक्यता 'सरकारनामा'ने यासंदर्भात गुरुवारी (ता.2 डिसेंबर) दिलेल्या बातमीत व्यक्त केली होती. ती 24 तासात खरी ठरली.

एका 42 वर्षीय पुरुष तक्रारदाराविरुद्ध सांगवी पोलिस ठाण्यात दोन तक्रार अर्ज करण्यात आले होते. त्याची चौकशी महिला फौजदार सोळूंके यांच्याकडे देण्यात आली होती. त्यात तक्रारदाराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांनी त्याच्याकडे एक लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र, लाच द्यायची नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (NCB) पुणे युनिटकडे तक्रार केली. तिची पडताळणी केल्यानंतर लावलेल्या सापळ्यात देसाईने लाच घेतली. मात्र, नंतर तो पळाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com