पालिका आयुक्तांची तक्रार नोंदवायला कृष्णप्रकाश यांच्या पोलिसांना लागले पाच दिवस

व्हाइट कॉलर गुन्हेगाराने मी पालिका आयुक्त राजेश (PCMC Commissioner Rajesh Patil) पाटील बोलत आहे, असे सांगत नगरसेवकांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला होता.
IPS Krishna Prakash & IPS Rajesh Patil
IPS Krishna Prakash & IPS Rajesh PatilSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील (PCMC Commissioner Rajesh Patil) यांचा बनावट व्हाटसअप प्रोफाईट बनवल्याप्रकरणी पोलिसांनी (Pimpri Police) गुन्हा नोंदविण्यास अक्षम्य दिरंगाई केल्याचे दिसून आले आहे. १७ जानेवारीच्या या घटनेप्रकरणी पालिका प्रशासनाच्या वतीने त्याच दिवशी ऑनलाईन तक्रार देण्यात आली. तरीही त्याबाबत गुन्हा नोंदविण्यास पोलिसांनी पाच दिवस घेतले. १७ तारखेला दिलेल्या या तक्रारीवर काल २२ तारखेला गुन्हा दाखल झाला.आयएएस (IAS) पालिका आयुक्तांचीच तक्रार एवढ्या उशीरा,जर दाखल होत असेल,तर आम्हाला त्यासाठी वेळ व आटापिटा करावा लागत असेल, हा प्रश्न यानंतर सर्वसामान्य विचारू लागले आहेत.तर, गुन्हाच काही दिवस उशीरा दाखल झाल्याने व पर्यायाने तपासासही तेवढी दिरंगाई झाल्याने या गुन्ह्यातील गुन्हेगाराचे आपसूक फावले असून त्याला फरार होण्यास पुरेसा वेळ मिळाला आहे.

IPS Krishna Prakash & IPS Rajesh Patil
राष्ट्रवादीच्या एकमेव उमेदवाराविरोधात शिवसेना मैदानात

दरम्यान, या व्हाइट कॉलर गुन्हेगाराने मी पालिका आयुक्त राजेश पाटील बोलत आहे, असे सांगत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याही नगरसेवकांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला होता. अमेझॉन गिफ्ट कार्डव्दारे आर्थिक मदतीची मागणी त्याने केली होती. पण, प्रामाणिक आयुक्तांचा स्वभाव माहित असल्याने तसेच ते असा फोन व चॅटिंग अजिबात करणार नाही,याची खात्री असल्याने हे नगरसेवक या भामट्याला फसले नाहीत आणि ही फसवणूक टळली.

राष्ट्रवादीचे भोसरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक अजित गव्हाणे,भोसरीतीलच भाजपचे नगरसेवक लक्ष्मण सस्ते, नगरसेविका आणि स्थायी समितीच्या माजी सभापती तथा अध्यक्षा सीमा सावळे, स्थायीचे विद्यमान सदस्य अंबरनाथ कांबळे यांना राजेश पाटील म्हणविणाऱ्या या ठकसेनाने फोन करून व नंतर व्हाटसअपवर चॅट करीत संपर्क साधून आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याबाबत शंका आल्याने थेट आयुक्तांशी संपर्क केला,असे गव्हाणे यांनी सरकारनामाला सांगितले. तर,तु्म्ही कुठं आहात,असं आयुक्त कधी विचारत नाहीत वा त्यांनी तसं विचारलेलं नाही, हा अनुभव जमेस धरून सावळे यांनीही लगेचच आयुक्तांशी संपर्क करीत या भामट्याचा डाव हाणून पाडला. तर, याअगोदरच अशा एका व्हाईट कॉलर ठकसेन तथा सायबर गुन्ह्यात बळी पडलेले कांबळे यांनीही यावेळी त्यापासून धडा घेत आयुक्तांशीच थेट संपर्क करीत आपली दुसऱ्यांदा होणारी फसवणूक टाळली.

IPS Krishna Prakash & IPS Rajesh Patil
काँग्रेस नगरसेवकाचा भाजपकडून सत्कार अन्‌ विष्णूअण्णांनी केलेल्या पवारांच्या त्या सत्काराची आठवण ताजी!

गेल्यावर्षी पिंपरी-चिंचवड स्मार्टसिटीच्या कमांड सेंटरवर सायबर अटॅक झाला होता. त्यावेळी पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्याचा शोध अद्याप लागलेला नसतानाच यावर्षाच्या सुरवातीस, तर थेट आयुक्तांच्या फोटोचा व्हॉटस्अप प्रोफाईल म्हणून वापर करीत ऑनलाईन चॅटींगद्वारे नगरसेवकांना आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आयुक्तांच्या फेक आयडी आणि प्रोफाईलचा गैरवापर करीत अॅमेझानव्दारे भेटींची मागणी नगरसेवकांसह नागिरकांकडेही सदर सायबर गुन्हेगाराने केल्याने शहरात खळबळ उडाली. त्यामुळे त्याची दखल तातडीने घेत हा प्रकार समजलेल्या दिवशीच १७ तारखेला पालिकेच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख नीळकंठ पोमण यांनी आपल्या बॉसच्या (आयुक्त) बनावट व्हाटसअप प्रोफाईलप्रकरणी ऑनलाईन तक्रार दिली.मात्र,त्याबाबत पाच दिवसानंतर २२ तारखेला पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

अशा स्वरुपाचे तांत्रिक आणि क्लिष्ट गुन्हे लवकर उघडकीस येत नाहीत.त्यांचे उघडकीस येण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे.त्यामुळे अशा सायबर गुन्ह्यात फसवणूक झालेल्यांनी आपली रक्कम परत मिळेल हीआशा सोडूनच दिलेली असते. त्यात,जर गुन्हाच दाखल होण्याास मोठा उशीर झाला,तर तो उघडकीस येण्याची शक्यता आणखी मावळते.त्यामुळे आयुक्त पाटील यांच्यासंदर्भातील गुन्ह्यातील सायबर गु्न्हेगाराचा जलद शोध लागेल,का याविषयी जाणकार साशंकच आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com