काँग्रेस नगरसेवकाचा भाजपकडून सत्कार अन्‌ विष्णूअण्णांनी केलेल्या पवारांच्या त्या सत्काराची आठवण ताजी!

सांगलीतील भाजपच्या पराभूत उमेदवाराने काँग्रेसच्या विजयी उमेदवाराचा घरी जाऊन सत्कार केला
Amol Gawli-Taufiq Shikaldar
Amol Gawli-Taufiq Shikaldarsarkarnama
Published on
Updated on

सांगली : निवडणुकीत टोकाचे आरोप झाले की, वातावरण ताणले तरी निकालानंतर सारे प्रवाह एकरुप झाले पाहिजेत, अशी भाषणबाजी सगळीकडे पहायला मिळते. सांगली येथील खणभागातील वेगवेगळ्या विचार प्रवाहांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी मात्र वास्तवात नुकतेच ते करून दाखवले. सांगली महापालिकेच्या प्रभाग १६ च्या निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या (bjp) अमोल गवळी यांनी काँग्रेसचे (congress) विजयी नगरसेवक तौफिक शिकलदार यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या पुढाकाराने खणभागातील जिव्हाळ्याचा झरा पुन्हा एकदा खळाळून वाहता झाला. (In Sangli defeated BJP candidate went home and felicitated winning Congress candidate)

दरम्यान, सांगलीच्या विधानसभेच्या १९८६ मधील पोटनिवडणुकीत संभाजी पवार यांनी विष्णूअण्णा पाटील यांचा पराभव केला होता. त्यावेळी अण्णांनी राजवाडा चौकात जाऊन संभाजी पवार यांना हार घातला होता. त्या घटनेची आजच्या सत्काराच्या निमित्ताने आठवण आली आणि तीच परंपरा सांगलीच्या राजकारणात पुढे चालू राहील, असा विश्‍वासही व्यक्त झाला.

Amol Gawli-Taufiq Shikaldar
शिवसेनेच्या सर्वांत तरुण नगरसेविकेकडून विजयाबद्दल मतदारांना अनोखे ‘रिटर्न गिफ्ट’

सांगलीचा खणभाग म्हणजे एक गाव, खेडे आहे. या भागात अनेक कुटुंबे वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने नांदत आली आहेत. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे पूल येथे बांधले गेले आहेत. निवडणुकीत थोडा ताण निघतो, वाद होतात, चर्चा होते, स्पिरीट बाहेर येते. मात्र, मतदान संपले, निकाल लागला की पुन्हा गळ्यात गळे घालून लोक वाट तुडवू लागतात.

Amol Gawli-Taufiq Shikaldar
राष्ट्रवादीच्या त्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारणार नाही; उलट नवी जबाबदारी देणार!

या बाबत भाजपचे पृथ्वीराज पवार म्हणाले की, ‘‘खणभागच काय तर सांगली जिल्ह्याची ही परंपरा आहे. राजकारणातून धार्मिक किंवा सामाजिक वितुष्ट निर्माण व्हावे, हे आम्हाला नको आहे. हा विकासाचा प्रवाह आहे आणि तो सतत खळखळ, आनंदाने वाहता राहिला पाहिजे. अमोल गवळी आणि मी तौफिक यांचा सत्कार आणि अभिनंदन करण्यामागे तोच विचार होता.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com