Rupali Patil-Thombare : रूपाली पाटलांना आमदारकीचे वेध; शहराध्यक्षांनीच टोचले कान !

Rupali Patil-Thombare : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांनीच रूपाली पाटील-ठोंबरे यांना घरचा आहेर दिला
Prashant Jagtap and Rupali Patil-Thombare
Prashant Jagtap and Rupali Patil-ThombareSarkarnama
Published on
Updated on

Rupali Patil-Thombare : भारतीय जनता पार्टीच्या आमदार मुक्ता टिळक यांचे पाच दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त होतेय. मुक्ताताईंच्या निधनाने एका चांगल्या व्यक्तीमत्वाला आपण सारेच मुकलोय. त्यांच्या निधनाला अजून दहा दिवस देखील झाले नाहीत. अशावेळी त्यांच्या जागेवरील निवडणुकीची चर्चा कुणीही करीत असेल तर ती चुकीची आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी रूपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil-Thombare) यांना घरचा आहेर दिला आहे.

पुण्याची राजकीय संस्कृती वेगळी आहे. पुण्याने नेहमीच संपूर्ण देशाला दिशा दिली आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर अशाप्रकारची राजकीय चर्चा पुण्यात होणे योग्य नाही, असे जगताप यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर उपाध्यक्ष रूपाली पाटील-ठोंबरे यांनी मुक्ता टिळक यांच्या जागेवर कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. पक्षाने संधी दिली तर आपण नक्की निवडणूक लढवू, असे सोमवारी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते. त्यावर चौफेर टीका झाल्यानंतर शहराध्यक्ष जगताप यांनी व्हिडीओ प्रसिद्ध करून आपली भूमिका स्पष्ट केली.

Prashant Jagtap and Rupali Patil-Thombare
Anil Deshmukh News : देशमुख जेलमधून सुटणार; पण न्यायालयाच्या 'या' आदेशामुळे होणार अडचण

जगताप म्हणाले, ‘‘ पुण्याची राजकीय संस्कृती खूप वेगळी आहे. पुण्याने देशाला दिशा दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे कुणीही अशी इच्छा व्यक्त केली तरी अशी चर्चा पूर्णपणे चुकीची आहे. गेल्या दोन दिवसात बिनविरोध निवडून देण्याची चर्चा भाजपातील काहींनी सुरू केली होती. कुणीही असले तरी अशी चर्चा योग्य नाही. निवडणुकीचा विषय ज्यावेळी व्हायचा तेव्हा होईल. मात्र, त्यावर चर्चा करण्याची ही वेळ नाही, हे संबंधितांनी लक्षात घ्यावे.’’

Prashant Jagtap and Rupali Patil-Thombare
Winter Session News : आघाडी चिडीचूप; फडणवीसच दिसले विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत!

पक्षातील पदाधिकाऱ्यांनाही शहराध्यक्ष जगताप यांनी सुनावले. ते म्हणाले, ‘‘पोट निवडणुकीच्या संदर्भाने पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी भूमिका मांडू नये, अशी शहराध्यक्ष या नात्याने सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना माझी सक्त ताकीद आहे.’’ रूपाली पाटील-ठोंबरे यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधत मांडलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष या नात्याने जगताप यांनी ‘व्हीडीओ’च्या माध्यमातून कान टोचले. त्याचीच चर्चा सोशल मीडीयावर आता सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com