अजित पवारांनी बारामती शहर राष्ट्रवादीची सूत्रे दिली तरुण नेत्याच्या हाती!

मावळते अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांचा कार्यकाळही संपलेला होता. नव्याने पक्षबांधणीसाठी युवा कार्यकर्त्याची गरज होती.
Jai Patil
Jai PatilSarkarnama

बारामती : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने (NCP) आगामी बारामती (Baramati) नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक फेरबदलास प्रारंभ केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (ता. ६ ऑक्टोबर) माजी उपनगराध्यक्ष जय पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी बारामती शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र पाटील यांना दिले. (Jai Patil elected as President of Baramati City NCP)

बारामती राष्ट्रवादीत संघटनात्मक फेरबदलाची मागणी गेल्या काही महिन्यांपासून कार्यकर्त्यांमधून होत होती. मावळते अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांचा कार्यकाळही संपलेला होता. नव्याने पक्षबांधणीसाठी युवा कार्यकर्त्याची गरज होती. ही बाब ओळखून जय पाटील यांच्यावर माजी उपमुख्यमंत्री पवार यांनी ही जबाबदारी सोपवली आहे.

Jai Patil
सतेज पाटील महाडिकांना सोलापुरातही धक्का देणार : ‘भीमा’च्या निवडणुकीत पाटील-परिचारकांना साथ?

जय पाटील हे नगरसेवक आणि मागील काळात उपनगराध्यक्ष होते, त्यांनी वृक्षारोपणाच्या मोहिमेत उल्लेखनीय काम केले आहे. नगरसेवकपदाच्या काळात त्यांनी विविध विकास कामांमध्ये सक्रीय योगदान दिलेले आहे. संयमी व मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख असल्याने अजित पवार यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली आहे.

Jai Patil
Nashik Graduate Constituency : विखे-थोरात सामना रंगणार? : भाजपकडून विखे-पाटलांच्या भावाचे नाव आघाडीवर!

भाजपने मिशन बारामतीचा नारा दिला आहे. लोकसभेच्या दृष्टीने भाजपची तयारी सुरु झाली असून बारामतीवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे, त्या पार्श्वभूमीवरही राष्ट्रवादीच्या संघटनात्मक बदलाकडे पाहिले जात आहे. आगामी काळात अधिक आक्रमकपणे काम करण्याची गरज लक्षात घेऊनही राष्ट्रवादीने संघटनात्मक फेरबदलास प्रारंभ केला आहे. दरम्यान, सर्वांना विश्वासात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बांधणी अधिक प्रभावीपणे करणार असल्याचे जय पाटील यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com