Jaykumar Gore|राष्ट्रवादीत बारामती, फलटणकरांची घराणेशाही... जयकुमार गोरेंचा टोला

Jaykumar Gore| BJP| आता फलटण तालुक्यातील भाकरी फिरवायची वेळ आली आहे.
Jaykumar Gore| BJP|
Jaykumar Gore| BJP|

बिजवडी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमुळे देशात आमूलाग्र बदल होवून अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही. मात्र, कॉंग्रेससह राज्यातील राष्ट्रवादीत (NCP) बारामती आणि फलटणकरांची घराणेशाही मात्र, एकदम ओक्केच असल्याचा टोला भाजपाचे (BJP) जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून सुरु झालेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याची सुरुवात करताना ते फलटण तालुक्यातील विविध गणांमधील मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपाचे संघटक सरचिटणीस शेखर वडणे, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे,तालुकाध्य बजरंग गावडे, विश्वासराव भोसले, पिंटू हिवरे तसेच तालुक्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी, गावोगावचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Jaykumar Gore| BJP|
Ratnagiri Politics|आदित्य ठाकरेंनी शंंभर कोटी घेतले; रामदास कदमांचा गौप्यस्फोट

आमदार गोरे म्हणाले, देश आणि राज्य प्रगतीपथावर नेणाऱ्या भाजपावर जनतेचा मोठा विश्वास आहे. विरोधी पक्षांमधील अनेकजण भाजपाचे कमळ हाती घेत आहेत. आता फलटण तालुक्यातील भाकरी फिरवायची वेळ आली आहे. सगळीकडे एकाच कुटुंबातील व्यक्ती विविध पदे भूषवित आहेत. रामराजेंची घराणेशाही तालुक्यात सुरु असल्याने कुवत असणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांवर कित्येक वर्षे अन्याय होत आहे. त्यांनी सामान्य माणसाला कधी संधीच दिली नाही. इथल्या जनतेला आता आरपारची लढाई लढून तालुक्यात आमदारकीपासून जिल्हापरिषद, पंचायत समितीसह नगपालिकेतही बदल करायची वेळ आली आहे.

माण तालुक्यात सदाशिव तात्यांची चाळीस वर्षे निष्क्रिय सत्ता होती. तालुक्याचा विकास ठप्प झाला होतामाणच्या स्वाभिमानी जनतेने १३ वर्षांपूर्वी बदल करुन सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आमदार केले. आज तालुक्याचे आणि मतदारसंघाचे चित्र बदलले आहे. गावागावत किट्यवधींची विकासकामे मार्गी लागली आहेत. रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे. विविध योजनांचे पाणी पोहचले आहे. सर्वत्र ऊसाची बागायती शेती पिकू लागली आहे. चार साखरकारखाने सुरु आहेत. मात्र फलटण तालुक्यातील रामराजेंची अनेक वर्षे सत्तेत राहून, मंत्रीपदे भोगून काहीच केले नाही हे दुर्दैव आहे. लोकांनी त्यांच्यावर अवलंबून राहून त्यां दारात हांजी हांजी करायला गेले पाहिजे अशी त्यांची वृत्ती असल्याने घराणेशाही बोकाळली आहे. येणाऱ्या सर्वच निवडणूकांमध्ये फलटण तालुक्यातील जनतेने सर्वसामान्यांची आणि भाजपाची ताकद दाखवत सामान्य माणसांचे राज्य आणावे असे आवाहनही त्यांनी केले.

रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले,केंद्रात आणि राज्यात आपली सत्ता असल्याने आम्ही विकासकामात कुठेच कमी पडणार नाही. केंद्राच्या जलजीवन, आयुष्यमान अशा अनेक योजना जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल करत आहेत. आम्ही केंद्राच्या माताभगिनींसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी असणाऱ्या सर्वच योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर देत आहोत. फलटण तालुक्यात एमआयडिसी, रेल्वे, फोरलेन रस्त्यांची कामे मार्गी लागत आहेत. ज्यांनी आजपर्यंत तालुक्याला लुटले त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आम्ही वज्रमुठ बांधली आहे. येणाऱ्या काळात त्यांना जशास तसे उत्तर देवू . तालुक्यातील गावोगावी विकासपर्व उभे करण्यासाठी आगामी काळात भाजपाचे पक्षसंघटन मजबूत करण्यावर आम्ही भर देत आहोत. जनता भाजपाच्या पाठिशी मोठी ताकद उभी करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com