Jayshree Palande News : आक्रमक महिला नेत्या जयश्री पलांडे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार : येत्या बुधवारी करणार भाजप प्रवेश

त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पलांडे यांचे फोनवर बोलणे करून देवूनच दिले. त्यांतरच बावनकुळे यांनी पक्षप्रवेशाची तारीख निश्चित केल्याचे सांगण्यात येत आहे.
Jayashree Palande
Jayashree PalandeSarkarnama

शिक्रापूर (जि. पुणे) : भाजपकडून शिरूर (Shirur) विधानसभा निवडणूक लढविलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या माजी उपाध्यक्षा तथा उध्दव ठाकरे गटाच्या नेत्या जयश्री अशोकराव पलांडे (Jayashree Palande) यांचा भाजपप्रवेश (BJP) निश्चित झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या बुधवारी (ता. ५ एप्रिल) मुंबईत प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत त्या भाजपत जाणार आहेत. (Jayashree Palande will join BJP in Mumbai next Wednesday)

जयश्री पलांडे १९९० पासून भाजपच्या माध्यमातून सक्रीय राजकारणात उतरल्या होत्या. आक्रमक महिला नेत्या अशी त्यांची पुणे जिल्ह्यात ओळख होती. त्यांनी भाजपकडून १९९९ मध्ये निवडणूक लढवली होती. पुढे २००४ मध्ये त्यांना भाजपाकडून शिरूरमधून तिकीट निश्चित असताना बाबूराव पाचर्णे यांना अचानक तिकीट दिले गेले. पाचर्णे आमदारही झाले होते. पुढील काळात भाजपकडून अन्याय झाल्याच्या भावनेतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत त्यांनी संचालक आणि उपाध्यक्षपदापर्यंत काम पाहिले.

Jayashree Palande
Karnataka Election: भाजपने खेळला मोठा डाव; निवडणूक जाहीर होण्याच्या काही तास आधी काँग्रेस मुख्यमंत्र्यांबाबत घेतला हा निर्णय..

राष्ट्रवादीतही आपल्यावर अन्याय होतोय, असे वाटल्याने त्या गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेत सक्रीय झाल्या हेात्या. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच पलांडे यांनी पक्षांतर केले नव्हते. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांची भाजपमधील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्याने त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय झाला आहे. त्यांच्यासोबत ठाकरे गटाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये येत्या बुधवारी (ता. ५ मार्च) प्रवेश निश्चित झाला आहे.

Jayashree Palande
Solapur NCP News : राष्ट्रवादी नेत्याच्या अंगावर ट्रक घालणारा चालक म्हणतो ‘तो मी नव्हे’च!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चार दिवसांपूर्वी प्राथमिक चर्चा पुण्यात झाली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पलांडे यांचे फोनवर बोलणे करून देवूनच दिले. त्यांतरच बावनकुळे यांनी पक्षप्रवेशाची तारीख निश्चित केल्याचे सांगण्यात येत आहे.

Jayashree Palande
Karnataka Assembly Election : कर्नाटकातील भाजप आमदारांना ‘गुजरात मॉडेल’ची चिंता : कुणाचा पत्ता कट होणार.... कुणाला लॉटरी लागणार?

शिवसैनिकांवरील गुन्हे ...

चास कमान धरणाच्या पाणी वाटपाच्या वादावरून २०२० मध्ये शिरूर तालुक्यातील जातेगाव खुर्द येथील शिवसेनेचे माजी सरपंच समाधान डोके यांच्यासह ६५ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत हा विषय पोचविला होता. या शिवाय युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याशीही स्वत: डोके फोनवर बोलले होते. मात्र, राष्ट्रवादी नेत्यांच्या सांगण्यावरुन हे गुन्हे दाखल झाल्याच्या आरोप-प्रत्यारोपातूनच अनेकांनी भाजपत जाण्याची तयारी सुरू केली होती. पलांडे यांच्या भाजप पक्षप्रवेशाने शिरूरमधील भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com