Jejuri Trustee Dispute : जेजुरी विश्वस्तांचा वाद आता कोर्टात जाण्याची शक्यता; ग्रामस्थ मार्गदर्शक मंडळाची स्थापना करणार

Jejuri Citizen : आपली बाजू कायदा स्तरावर टिकविण्यासाठी ग्रामस्थांच्या हलचाली
Agitation in Jejuri
Agitation in JejuriSarkarnama
Published on
Updated on

Martand Devsansthan Trustee : जेजुरी खंडोबा मंदिराच्या सात जणांच्या विश्वस्त मंडळात जेजुरीबाहेरील तब्बल पाच जणांनी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती सहधर्मदाय आयुक्तांनी केलेली आहे. या पदासाठी सुमारे ३५० जेजुकरांनी मुलाखती दिल्या होत्या. त्यातील फक्त एक जणांचीच निवड करण्यात आली. या निवडीसाठी आयुक्तांनी कोणते निकषांचा विचार केला, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, नियुक्ती झालेल्या विश्वस्तांनी पदभार स्वीकारला आहे. आता या नियुक्तीवर तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहे. या विश्वस्त मंडळाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनास दिशा देण्यासाठी आता नागरिाकांचे मार्गदर्शक मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. (Jejuri Trustee Dispute)

Agitation in Jejuri
Jejuri Trustees Dispute : जेजुरी मंदिर विश्वस्त निवडीला विरोध करत भाजप पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

जेजुरीबाहेरील निवडलेल्या या विश्वस्तांच्या निवडीचा जेजुरी खांदेकरी-मानकरी ग्रामस्थ मंडळासह ग्रामस्थांनी निषेध केला आहे. आंदोलन करून आपला रोषही व्यक्त केला. या निवडीच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी पुणे-पंढरपूर महामार्गार रास्ता रोको आंदोलन केले. निवडलेल्या विश्वस्त मंडळाला कोणत्याही प्रकारचे सहाकर्य न करण्याचा ठरावही ग्रामस्थांनी मंजूर केला आहे. आता जेजुरी येथे या निवडीच्या निषेधार्थ चक्री उपोषण सुरू आहे. या चक्री उपोषणाचा आज मंगळवारी (ता. ३० मे) पाचवा दिवस आहे. दरम्यान, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही आपल्या पदांचा राजीनामा देत या नियुक्तींचा निषेध केला आहे.

Agitation in Jejuri
Pune youth protest : जमिनीच्या नोंद प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी तरुणाचं 'शोले स्टाईल' आंदोलन; अथक प्रयत्नांनंतर खाली उतरला !

जेजुरीत वर्षभरात सात यात्रा भरविल्या जातात. त्या यात्रांचे विशेष असे महत्व असते. त्यामागील रुढी, परंपरा स्थानिकांना चांगल्या माहिती आहेत. बाहेरच्या लोकांना त्यातील बारकावे माहिती नसतात. ते फक्त खुर्चीवरून कारभार करतील. यातून चुकीचे निर्णय घेऊन लोकांच्या भावना दुखावण्याची शक्यता असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. दरम्यान, काही घटना घडल्या तर स्थानिक पदाधिकारी त्यावर तात्काळ निर्णय घेऊ शकतात. या विचारातूनच विश्वस्त मंडळात जास्तीत जास्त स्थानिकांचा समावेश असावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Agitation in Jejuri
Manish Sisodia News: मनीष सिसोदियांना दिल्ली हायकोर्टाचा झटका; जामीन अर्ज फेटाळत केली महत्वाची टिप्पणी

आता या विश्वस्त मंडळाविरोधात ग्रामस्थ न्यायालयात जाण्याच्या विचारात आहेत. या आंदोलनाला कायदेशीर स्तरावर टिकविण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांचे मार्गदर्शक मंडळ स्थापन करण्याच्या हलचाली सुरू आहेत. याबाबत ग्रामस्थ आणि आंदोलनाचे कायदेशीर सल्लागार अॅड. अशोक भोसले यांनी माहिती दिली.

ते म्हणाले, "जेजुरी मंदिर विश्वस्त मंडळावर सहधर्मदाय आयुक्तांनी नियुक्ती केली आहे. त्यात पाच जण बाहेरील आहेत. या मंडळास ग्रामस्थ असहकार करणार आहेत. या नियुक्तीविरोधात ग्रामस्थ न्यायालयात धाव घेणार आहेत. त्यासाठी ग्रामस्थांच्या मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. या मंडळाची बुधवारी (ता. ३१ मे) घोषणा होणार आहे. या मंडळात दहा विविध समाजातील एक असे दहा प्रतिनिधी तर एक कायदा सल्लागार अशा अकरा जाणांचा समावेश असेल. हे मंडळ ग्रामस्थांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी विचारविनीमय करेन."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com