Atul Benke News : जुन्नरचे आमदार बेनके अजितदादांसोबतच; कोल्हेंची लोकसभेची वाट बिकट होणार

NCP Ajit Pawar Group : ...तर खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची पुन्हा लोकसभेची वाट आणखी बिकट होणार आहे.
Ajit Pawar-Atul Benke-Sharad Pawar
Ajit Pawar-Atul Benke-Sharad PawarSarkarnama

Pimpri Chichwad News: राष्ट्रवादी कॉंग्रेस दुभंगल्यानंतर पक्षाचे काही आमदार व्दिधा मनस्थितीमुळे ना शरद पवार ना अजित पवार गटात गेले होते.तटस्थ भूमिका घेत कुंपणावर राहिलेल्या या आमदारांत जुन्नरचे अतुल बेनके होते. त्यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवाराच्या शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या गुरुवारच्या (ता.25) दौऱ्यात अखेर अजित पवार गटाची वाट धरली. त्यामुळे शिरुरचे शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हेंना पराभूत करण्याच्या अजितदादांनी दिलेल्या आव्हानाला बळ मिळाले आहे.

दरम्यान,राष्ट्रवादीतील दुफळीनंतर शिरुर लोकसभा मतदारसंघात तटस्थ भूमिका घेत कुंपणावर बसलेले हडपसरचे आमदार चेतन तुपे हेही नुकतेच अजित पवार (Ajit Pawar) गटाला जाऊन मिळाले. त्यामुळे आता शिरुर लोकसभेतील शिरुर-हवेलीचे पक्षाचे आमदार अशोक पवार याच एकमेव आमदारांची भूमिका स्पष्ट होणे बाकी राहिली आहे.

Ajit Pawar-Atul Benke-Sharad Pawar
NCP Ajit Pawar : आमचं ठरलंय, अजित पवार गटाचा जिल्हाध्यक्ष करणार बंड!

पण,तेही आपल्या राजकीय भवितव्याचा विचार करून अजितदादा गटातच सामील होतील,अशी शक्यता आहे. त्याला आमदार बेनके यांनीही आज त्यांनी अजितदादांची साथ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुजोरा दिला. तसं झालं, तर खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची पुन्हा लोकसभेची वाट आणखी बिकट होणार आहे.

जुन्नरकर जनतेसाठी अजितदादांची साथ देण्याचा निर्णय घेतला असला,तरी मूळ पक्ष सोडलेला नाही,अशी प्रतिक्रिया आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी आपल्या निर्णय़ावर 'सरकारनामा'ला दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, यापूर्वी त्यांच्या मतदारसंघात झालेल्या शरद पवार यांच्या दोन दौऱ्यात ते सामील झाले होते. दोन्ही पवारांबरोबर म्हणजे पवार कुटुंबाबरोबर आणि पक्षासोबत असल्याचे वारंवार त्यांनी स्पष्ट केले होते.

दुसरीकडे शरद पवारांनी (Sharad Pawar) जुन्नरमध्ये आमदार बेनकेंना पर्याय देण्याची चाचपणी सुरु केली होती. जुन्नर मतदारसंघातील ही बदलती राजकीय समीकरणे पाहून आमदार बेनकेंनी अखेर तटस्थ भूमिका सोडून अजितदादांची साथ देण्याचा निर्णय घेतला.तो त्यांनी आज अजितदादांच्या जुन्नर दौऱ्यावेळी शेतकरी मेळाव्यात जाहीर करून टाकला. त्यामुळे बेनके परिवाराचे शरद पवारांशी असलेले चार दशकाचे कौटुंबिक नाते तुटल्यात जमा झाले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Ajit Pawar-Atul Benke-Sharad Pawar
Loksabha Election 2024: पहिलं आमंत्रण धुडकावले, आता पुन्हा वंचितला आघाडीचे पत्र

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com