Kasaba By-Election : एक वर्षाचाच कालावधी होता, उमेदवारी मिळाली असती तर बरं झालं असतं...

Shailesh Tilak : "पुण्यात एकही ब्राह्मण उमेदवार नाही, ब्राम्हणांमध्ये अन्यायाची भावना असण्याची शक्यता."
Shailesh Tilak  | Kasaba By-Election
Shailesh Tilak | Kasaba By-Election Sarkanama
Published on
Updated on

Kasaba By-Election : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपच्या उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र आता अखेरीस भाजपने माजी नगरसेवक हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. यावर आता टिळक यांची पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली.

शैलेश टिळक म्हणाले, "कसबा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत आम्ही सांगितले होते की, मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांचे अर्धवट स्वप्न पूर्ण होण्यासाठी आम्ही इच्छूक आहोत. टिळक घरातील सदस्याला उमेदवारी मिळाली पाहिजे होती. अशा परिस्थितीत नैसर्गिकपणे घरच्या कुटुंबियांना उमेदवारी मिळते. यामुळे आम्हाला उमेदवारी मिळेल अशी आशा वाटत होती."

Shailesh Tilak  | Kasaba By-Election
Election News : मोठी बातमी! भाजपचे उमेदवार जाहीर; कसब्यासाठी हेमंत रासने तर चिंचवडसाठी अश्विनी जगताप

"आम्हाला आशा वाटत होती की, आम्हाला उमेदवारी मिळेल. पण पक्षाने वेगळा विचार करून रासने यांना उमेदवारी जाहीर केले आहे. पक्षाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे आणि रासने यांना आमच्या शुभेच्छा आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट झाली आणि यावेळी निवडणुकीबद्दल चर्चा झाली. हा निर्णय दिल्ली वरुन होईल," असे त्यांनी सांगितले

Shailesh Tilak  | Kasaba By-Election
Kasaba By Election : उमेदवारी जाहीर होताच हेमंत रासने म्हणाले, "गिरीश बापट यांच्या.."

"ताई गेल्यानंतर फडणवीसांनी आमची भेट फार कमी वेळासाठी घेतली होती, म्हणून काल ते पुन्हा घरी आले होते. विधानसभेचा वर्षभराचा कालावधी आहे, घरच्या सदस्याला दिली असती, तर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जास्त होती. पण पक्षाचा निर्णय आम्हाला मान्य आहे," असे टिळक यांनी स्पष्ट कले.

Shailesh Tilak  | Kasaba By-Election
Kasba By Election : भाजप ठरलं कसब्यातून रासनेंना उमेदवारी; धंगेकरांच्या नावाची फक्त औपचारीकताच बाकी?

"कुणालला एक संधी आहे, खूप गोष्टी शिकता येतील. कुणालकडे एक सुवर्णसंधी आहे त्याला की त्याचे व्यक्तिमत्व आणखी प्रगल्भ होऊ शकतं. पुणे शहरात आज कुठलाही ब्राह्मण उमेदवार नाही. ब्राह्मणसमाजावर अन्यायाची भावना आहे आणि हीच भावना लोकांच्या मनात असण्याची शक्यता आहे," असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com