Kasba By-Election : ऐनवेळी कसब्यातील मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची सभा रद्द : कारण काय?

Kasba By-Election : सभा रद्द झाल्याने राजकीय चर्चांना उधाण...
Kasba By-Election : Devendra Fadnavis : Eknath Shinde
Kasba By-Election : Devendra Fadnavis : Eknath Shinde Sarkarnama

Kasba By-Election : पुण्यात पोटनिवडणुकीची (Pune Bypoll Election) प्रचार शिगेला पोहचला आहे. राज्यभरातील विविध राजकीय पक्षांचे नेते पुण्याच्या पोटनिवडणूकीसाठी पुण्यात प्रचार करताना दिसत आहेत. रोड शो, राजकीय सभा घेताना दिसत आहेत. मात्र याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंमंत्री देवेंद्रे फडणवीस यांची आज होणारी सभा रद्द करण्यात आली आहे. यामुळे कसबासाठी मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्र्यांची आता एकही सभा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Kasba By-Election : Devendra Fadnavis : Eknath Shinde
Sanjay Raut News; ‘ती’ शरद पवारांची राजकीय खेळी?

कसबा मतदारसंघाचे भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ डेक्कन येथील नदीपात्रात भाजपची आज साय़ंकाळी पाच वाजता सभा होणार होती. यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभा घेणार होते. मात्र आता ही प्रचारसभा रद्द करण्यात आली आहे. सभाऐवजी शिंदे आणि फडणवीस यांचा रोड शो होणार आहे.

सभा रद्द का झाली? असे विचारल्यावर माजी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, "जाहीर सभा घेण्यापेक्षा, रोड शोच्या माध्यमातून अधिक लोकांपर्यंत पोहचता येईल. यामुळे सभा रद्द केली गेली, असे उत्तर मोहोळांनी दिले. मात्र आयोजित केलेली सभा ऐनवेळी रद्द केल्यामुळे राजकीय तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

Kasba By-Election : Devendra Fadnavis : Eknath Shinde
Gadchiroli News: नक्षलवाद्यांची कोंडी करून विविध कारवाया सुरू, त्यांना स्थानिकांचा आधार नाही !

भाजपचे उमेदवार रासने यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. कसबा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विशेष लक्ष घातले होते. यासाठी त्यांनी दोन दिवसीय पुणे दौरा केला होता. फडणवीस यांच्यासोबत 40 स्टार प्रचारक ठाण मांडून आहेत. भाजपचे नेते गिरीश महाजन देखील पुण्यात तळ ठोकून आहेत. भाजपचे तब्बल १०० नगरसेवक रासनेंचा प्रचार करत आहेत. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची सभाच रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com