Pune By Election Result : कसब्यात रासने की धंगेकर ; चिंचवडचा नवा आमदार कोण ?

Kasba Chinchwad By-Election Result 2023 Live : रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात भाजपचे हेमंत रासणे रिंगणात आहेत.
Pune By Election Result : कसब्यात रासने की धंगेकर ;  चिंचवडचा नवा आमदार कोण ?
Published on
Updated on

Kasba Chinchwad By-Election Result 2023 Live : पुणे जिल्ह्यात कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) या दोन मतदारसंघात सुरु असलेल्या पोटनिवडणुकीसाठी आज (गुरुवार) मतमोजणी आहे.

चिंचवड येथे विठ्ठल काटे (NCP), भाजपच्या अश्विनी जगताप (bjp) आणि अपक्ष राहुल कलाटे या तीन उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात भाजपचे हेमंत रासणे रिंगणात आहेत.

Pune By Election Result : कसब्यात रासने की धंगेकर ;  चिंचवडचा नवा आमदार कोण ?
Maharashtra Budget 2023 : ठाकरे अन् त्यांच्या पत्नीचं पटत नाही, असं राऊतांनी..; राणेंचा गौप्यस्फोट

स्ट्रेलिमा आणि रिंगसाईड रिसर्च या दोन संस्थांचे एक्झिट पोल व्हायरल होत आहेत. त्यामध्ये कसब्यामध्ये भाजपला धक्का बसणार असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

चिंचवडची जागा मात्र भाजप राखणार असून अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या विजयी होतील असं म्हटलं आहे. कसब्यात दुहेरी, तर चिंचवडला तिरंगी लढत आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Pune By Election Result : कसब्यात रासने की धंगेकर ;  चिंचवडचा नवा आमदार कोण ?
Gulabrao Patil On Sanjay Raut: विधिमंडळाला चोरमंडळ म्हणणारी ही कुणाची औलाद ? ; गुलाबराव पाटील राऊतांवर भडकले...

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.या चुरशीच्या निवडणुकीत भाजपकडून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह जवळपास डझनभर मंत्री,नेते प्रचारात उतरवले होते. तर काँग्रेस व राष्ट्रवादीकडून देखील माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील कार्यकर्ते, नेत्यांची फौज उभी केली होती.

कसबा विधानसभा मतमोजणीच्या 20 फेऱ्या

कसबा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजता भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम, कोरेगाव पार्क पुणे येथे सुरू होत आहे. त्यासाठी मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार आहे.

ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल तर टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. सर्वप्रथम टपाली आणि ईटीपीबीएसची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी पर्यवेक्षक, 1 मतमोजणी सहायक आणि 1 सूक्ष्म निरीक्षक असे एकूण सुमारे 50 अधिकारी- कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

Pune By Election Result : कसब्यात रासने की धंगेकर ;  चिंचवडचा नवा आमदार कोण ?
Pune Bypoll News : ज्योतिषाचे भाकीत खरे ठरणार ? ; भाजप चिंचवडमध्ये गड राखणार, पण कसब्यात..

चिंचवडची विधानसभा मतमोजणी ३७ फेऱ्या

चिंचवडची मतमोजणी शंकर आण्णा गावडे कामगार भवन,थेरगाव येथे आहे. मतमोजणीसाठी तेथे १४ टेबल लावण्यात आली आहे. मतमोजणीच्या ३७ फेऱ्या होणार असून अधिकृत अंतिम निकाल यायला वाजणार रात्रीचे दहा वाजणार आहेत. मात्र,कसबा हा तुलनेने खूपच लहान मतदारसंघ असल्याने तेथील निकाल खूप लवकर लागणार आहे.

कसब्याच्या तुलनेत चिंचवडमध्ये कितीतरी अधिक म्हणजे ५१० मतदान केंद्र तसेच उमेदवारांचीही संख्या जास्त म्हणजे २८ होती.चिंचवडला २ लाख ८७ हजार ४७९ इतके मतदान झालेले आहे. याव्यतिरिक्त टपाली मतदानही आहे.त्यामुळे सकाळी सात वाजता सुरु झालेल्या या मतमोजणीचा अंतिम निकाल जाहीर करण्यासाठी किमान १४ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

Pune By Election Result : कसब्यात रासने की धंगेकर ;  चिंचवडचा नवा आमदार कोण ?
Pune Bypoll News : कसब्याचा निकाल लवकर, तर चिंचवडचा अधिकृत अंतिम निकाल यायला वाजणार रात्रीचे दहा..

फडणवीसांविरोधात धंगेकरांची तक्रार

कसबा विधानसभा मतदारसंघात निवडणूक आचारसंहितेचा भंग राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची तक्रार मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या तक्रारीत सांगितले आहे की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे कसबा मधील उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी दोन धर्मात फूट पडेल अशा प्रकारे जाणीवपूर्वक मतांचे ध्रुवीकरण होण्यासाठी वक्तव्य केलेली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या 2017 च्या निर्णयानुसार निवडणुकीतील कोणताही उमेदवार किंवा त्याच्याशी संबंधित नेते यांनी जाती-धर्माशी आधारित विधाने करणे गैर आहे. त्यानुसार देवेंद्र फडणवीस आणि हेमंत रासने यांच्यावर निवडणूक आयोगामार्फत योग्य ती कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com