Pune Bypoll News : ज्योतिषाचे भाकीत खरे ठरणार ? ; भाजप चिंचवडमध्ये गड राखणार, पण कसब्यात..

Kasba Chinchwad By Election Result : काँग्रेसचे उमेदवार धंगेकर यांच्या जन्म रविवरून होणारे शनीचे भ्रमण..
Hemant Rasane - ashwini jagtap
Hemant Rasane - ashwini jagtapSarkarnama
Published on
Updated on

Kasba Chinchwad By Election: पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. कसबा आणि चिंचवडमध्ये भाजप गड राखणार का ? या विषयी एक्झिट पोल, राजकीय विश्लेषकांच्या मतानंतर आता ज्योतीषशास्त्र काय सांगते, हे जाणून घेऊया..

पुण्यातील ज्योतीषी सिद्धेश्वर मारटकर यांनी कसबा आणि चिंचवडच्या निकालावर भाकीत केले आहेत. उमेदवारांच्या कुंडलीच्या आधारे मारटकर यांनी या निकालावर स्पष्टीकरण दिले आहे. गुरुवारी (ता.२) निकाल आहे.

" दोन मार्च रोजी पुनर्वसु हे गुरूचे नक्षत्र असून वार गुरुवार आहे.गुरू या ग्रहाचा भारतीय जनता पक्षावर अंमल असल्याने या दिवशी लागणारा निकाल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने लागण्याची शक्यता अधिक वाटते," असे मारटकरांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

Hemant Rasane - ashwini jagtap
BJP आता दिल्लीनंतर या राज्यातही दारु गैरव्यवहार उघड करणार ; विधानसभेसाठी नवी खेळी

मारटकर म्हणाले, "मी कोणत्या पक्षाचा नाही, ज्योतिष शास्त्रानुसार चिंचवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप व कसब्यात हेमंत रासने हे विजयी होऊ शकतात, पण कदाचित रासने यांच्याविषयीचे भाकीत चुकू शकते. हे नम्रपणे सांगावेसे वाटते,"

"उमेदवारांच्या मिळालेल्या जन्म तारखेच्या आधारे तसेच प्रश्न विचारलेल्या वेळेच्या प्रश्न कुंडलीच्या आधारे हेमंत रासने यांना ग्रहांची अनुकूलता असल्याने ज्योतिष शास्त्रानुसार त्यांना विजयाची संधी मिळू शकते असे वाटते. हेमंत रासने यांच्या जन्म रविवरून होणारे गुरूचे भ्रमण त्यांच्यासाठी लाभदायक होऊ शकते," असे मारटकर यांनी सांगितले.

Hemant Rasane - ashwini jagtap
AAP News : 'आप'च्या सिसोदिया, जैन यांनी या कारणांसाठी दिला राजीनामा

" काँग्रेसचे उमेदवार धंगेकर यांच्या जन्म रविवरून होणारे शनीचे भ्रमण निसटता पराभव दर्शवितो. अर्थात मिळालेल्या जन्म तारखाविषयी खात्री नसल्यामुळे भाकीत चुकू शकते हे नम्रपणे सांगावेसे वाटते," असे मारटकर यांनी नमूद केले आहे.

"ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने 2 मार्च रोजी पुनर्वसु हे गुरूचे नक्षत्र असून वार गुरुवार आहे.गुरू या ग्रहाचा भारतीय जनता पक्षावर अंमल असल्याने या दिवशी लागणारा निकाल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने लागण्याची शक्यता अधिक वाटते," असे मारटकर म्हणाले. " चिंचवडची जागा सुद्धा भाजपला मिळू शकते असा अंदाज व्यक्त करीत आहे.यासाठी प्रश्न कुंडली चा सुद्धा आधार घेण्याचा प्रयत्न केला आहे," असे मारटकरांनी स्पष्ट केलं.

Hemant Rasane - ashwini jagtap
Pune Bypoll News : कसब्याचा निकाल लवकर, तर चिंचवडचा अधिकृत अंतिम निकाल यायला वाजणार रात्रीचे दहा..

सत्तातरांचे भाकीत खरे ठरले...

मारटकर यांनी यापूर्वी 1999 पासून लोकसभा व विधानसभा निवडणुकी विषयी केलेली अनेक भाकिते खरी ठरली आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील याचे भाकीत केवळ मारटकर यांनीच केले होते. जून-जुलै 2022 मध्ये सत्तांतर होईल याचे भाकीत सुद्धा आधीच वर्तविले होते.

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा उद्या (ता.२) रोजी निकाल आहे. या निकालाबाबत स्ट्रेलिमा आणि रिंगसाईड रिसर्च या दोन संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहे. या पोलमुळे धाकधुक वाढली आहे. या दोन्ही एक्झिट पोलनुसार चिंचवडमध्ये भाजप गड राखणार आहे, तर कसब्यात भाजपला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com