Kasba Peth Bypoll Election : नावे गायब, अनेक जण मतदानापासून वंचित ; यादीत मयतांची नावे..

Kasba Peth Bypoll Election : नाव सापडत नसल्याने नाईलाजाने मतदान न करता नागरिकांना घरी जावे लागले.
Kasba By Election
Kasba By Election Sarkarnama
Published on
Updated on

Kasba Peth Bypoll Election live news update : सुरवातीपासूनच राज्याचे लक्ष वेधून घेतलेली कसबा पेठ पोटनिवडणूक अनेक कारणामुळे चर्चेत आहे. आज (रविवारी) मतदानास सुरवात झाली आहे. पहिल्या चार तासात ८.२५ चक्के मतदान झाले आहे.

काही ठिकाणी मतदार यादीत नाव नसल्याने मतदारांना मतदान करता आले नाही, तर काही मतदार याद्यांमध्ये मयतांची नावे आहेत. त्यांच्या नावावर बोगस मतदान होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.

अनेकांना मतदानाचा अधिकार बजावण्यात आला नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. मतदार याद्या अद्यावत केल्याचे सांगत असताना अनेकांनी नावे गायब झाल्याचा प्रकार घडला आहे. दोन-तीन केंद्रांवर फिरून नाव आहे का याची चौकशी केली जात आहे. पण नाव सापडत नसल्याने नाईलाजाने मतदान न करता नागरिकांना घरी जावे लागले.

Kasba By Election
Kasba Peth, Chinchwad Bypolls 2023 : पहिल्या चार तासात चिंचवडमध्ये 10.45 टक्के तर कसब्यामध्ये...

मतदार यादीतून नावे गायब होण्याच्या प्रकारामुळे हजारो मतदारांना गुरुवारी मतदानापासून वंचित राहावे लागले. नाव वगळण्यात आल्यामुळे झालेला मनस्ताप आणि भर उन्हात नाव शोधण्यासाठी करावी लागलेली वणवण यामुळे हजारो मतदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

कसबा पेठ विधानसभा मतदार संघात पहिल्या चार तासात केवळ सव्वा आठ टक्के मतदान झाले आहे.या निवडणुकीत एकूण दोन लाख ७५ हजार ६७९ इतके मतदान आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर या दोघांमध्ये चुरशीची होत असल्यामुळे आपापल्या हक्काचा मतदार बाहेर काढण्यासाठी भाजपचे आणि काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळच्यावेळेत मतदान करून घेतण्यावर दोन्ही पक्षांकडून भर देण्यात आला. पण मतदानाची टक्केवारी वाढताना दिसली नाही. कसबा विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते नऊ या वेळेत ६.५ टक्के मतदान झाले तर सकाळी नऊ ते ११ या वेळेत अवघे पावणे दोन टक्के मतदान झाले आहे.

काल (शनिवारी) मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला होता, त्यानंतर त्यांनी उपोषण केले. पोलिसांच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com