राष्ट्रवादीच्या गोपालघरेंचा विजय निश्चित; रामचंद्र ठोंबरेंची मतदानाअगोदरच माघार

ठोंबरे आणि गोपालघरे हे मामा-भाचे आहेत. त्यामुळे मामा विरूद्ध भाचा अशी निवडणुकीची चर्चा गेली अनेक दिवसांपासून सुरू होती.
Kalidas Gopalghare-Ramchandra Thombre
Kalidas Gopalghare-Ramchandra ThombreSarkarnama
Published on
Updated on

पौड (जि. पुणे) : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज, Katraj Dairy) पंचवार्षिक निवडणुकीत मुळशी तालुक्यातील पंधरापैकी नऊ जणांनी मतदान केले. तथापि ज्येष्ठ नेते रामचंद्र ठोंबरे यांनी मतदानाच्या आदल्या रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) उमेदवार तथा सख्खे भाचे कालिदास गोपालघरे यांना पाठींबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोपालघरे यांच्या विजयाची औपचारीक घोषणाच बाकी आहे. (Katraj Dairy Election: NCP's Kalidas Gopalghare's victory is certain)

ठोंबरे आणि गोपालघरे हे मामा-भाचे आहेत. त्यामुळे मामा विरूद्ध भाचा अशी निवडणुकीची चर्चा गेली अनेक दिवसांपासून सुरू होती. दोघांनीही उमेदवारी अर्ज भरले होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे यांनी मामा-भाच्यांनी एकत्र बसून एकच नाव द्यावे, असा प्रस्ताव दिला होता. परंतू दोघांनाही विजयाची खात्री असल्याने कुणीच माघार घेतली नाही. त्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी गोपालघरे यांना राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर केली.

Kalidas Gopalghare-Ramchandra Thombre
मला मंत्री केले असते तर शिवसेनेचे आठ आमदार करून दाखवले असते : क्षीरसागरांची खंत

तथापि मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत दूध संस्था वाढवून मतदारांची संख्या वाढविणे तसेच मतदार बाद करणे याबाबत न्यायालयीन कुरघोडी चालू होती. त्यामुळे विजयबाबत दोन्ही बाजूने रस्सीखेच चालू होती. मात्र, शनिवारी (ता. १९ मार्च) रात्री उशीरा ठोंबरे यांनी गोपालघरे यांना पाठींबा दिल्याचे  पत्र काढले. दरम्यान सकाळी नऊ वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गोपालघरे यांच्यासमवेत नऊ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परंतु ठोंबरे यांच्यासह सहा जणांनी मात्र मतदान केले नाही, त्यामुळे गोपालघरे यांचा विजय निश्चित असून केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.

Kalidas Gopalghare-Ramchandra Thombre
शिवसेनेचे पाच आमदार पाडणाऱ्या काँग्रेसला जागा सोडावी लागल्याचे दुःख मोठे

ही कसली पक्षनिष्ठा

रामचंद्र ठोंबरे हे गेली ४२ वर्षांपासून दूध संघाचे संचालक आहेत. काळाची पावले ओळखून त्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना पाठींब्याचे  बिनतारखेचे पत्र दिले आहे. परंतु मतदानाचे कर्तव्य मात्र बजावले नाही. मतदानाला न येऊन त्यांनी  इतर प्रवार्गातील राष्ट्रवादीचेच मतदान बुडविले आहे. पाठींबा देवून मतदान बुडविणे याला कसली पक्षनिष्ठा म्हणायची, असा प्रश्न मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com