‘कात्रज’चे अध्यक्ष होताच तिसऱ्याच दिवशी केशरताई पवारांचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

कात्रज दूध संघ गाईच्या दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ : अध्यक्ष केशरताई पवारांची जुन्नरच्या कार्यक्रमात मोठी घोषणा
Keshartai Pawar
Keshartai PawarSarkarnama

शिक्रापूर (जि. पुणे) ः पुणे जिल्हा सहकारी दूध संघाच्या (कात्रज डेअरी, Katraj Dairy) अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अवघ्या तीनच दिवसांत केशरताई पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. गाईच्या दुधाला लिटरला दोन रुपये वाढवून तो ३३ रुपयांऐवजी ३५ रुपये देण्याची घोषणा त्यांनी जुन्नर तालुक्यातील एका सत्काराच्या कार्यक्रमात केली. विशेष म्हणजे त्याची अमंलबजावणी येत्या ११ एप्रिलपासून होणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष पवार यांनी सांगितले. (Katraj Dudh Sangh will increase purchase price of cow's milk by Rs 2 : Keshartai Pawar)

पुणे जिल्हा सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदी केशरताई पवार, संचालकपदी बाळासाहेब खिलारी आणि भाऊ देवाडे यांची निवड झाल्याबद्दल जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील गणेश सहकारी व्यावसायिक दूध संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. याच कार्यक्रमात गणेश दूध संस्था गाईच्या दुधाला ३५ रुपये प्रतिलिटर भाव देत असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर संघाचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक बाळासाहेब खिलारी व भाऊ देवाडे यांच्याशी चर्चा करून गाईच्या दुधाचा भाव दोन रुपये वाढवून ३५ रुपये देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाला कार्योत्तर मंजुरी लवकरच देणार असून हा निर्णय येत्या ११ तारखेपासून लागू होईल, असेही त्यांनी सांगितले.

Keshartai Pawar
भाजप हा सहकारी पक्ष, नेत्याला संपवतो, हे राज ठाकरेंनी लक्षात ठेवावे : रोहित पवारांचा सल्ला

केशरताई पवार म्हणाल्या की, राजुरी येथील गणेश दूध संस्थेला शेतकऱ्यांच्या हितांचा विचार करणारी संस्था म्हणून केंद्र व राज्य सरकारचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या संस्थेचा आदर्श राज्यातील इतर संस्थांनी घ्यावा. येथे आल्यावर समजले की, ही संस्था शेतकऱ्यांना गाईच्या दुधासाठी ३५ रुपये भाव देते. मग, राज्यात आदर्श असलेल्या कात्रज संघाने मागे का राहावे; म्हणून सहकारी दोन्ही संचालकांशी चर्चा करुन मी दोन रुपयांची भाववाढ तत्काळ जाहीर करुन येत्या ११ तारखेपासून ती अंमलातही आणणार आहे.

Keshartai Pawar
"मी तर कधीपासून तुझाच मावळा" : वसंत मोरेंकडून बाबर यांचे अभिनंदन!

आगामी काळात कात्रज डेअरीचा चेहरामोहरा आपल्याला बदलायचा आहे. अनेक महत्वकांक्षी निर्णयही आपण सर्व संचालकांच्या मदतीने घेणार आहोत. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व आमदार यांनी आपल्या निवडणुकीवेळी जी मदत केली, त्याची उतराई कामातून होणार असल्याचा पुनरुच्चारही पवार यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना केला.

Keshartai Pawar
‘भोंग्याचा पहिला बळी’; वसंत मोरेंची हकालपट्टी : पुणे मनसेचे नवे अध्यक्ष साईनाथ बाबर

दैनंदिन दूध संकलन पाच लाख लिटर करणार

पुणे जिल्ह्यात अनेक खासगी दुध संस्था असतानाही कात्रजचे दैनंदिन दूध संकलन एक ते दीड लाख लिटरच्या आसपास होते. ते दैनंदिन दूध संकलन पाच लाख लिटरपर्यंत नेण्याचे माझे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांची संस्था, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांच्या उत्कर्षाठी झटत असल्याचे मी व संपूर्ण संचालक मंडळ दूध उप्तादकांना पटवून देणार आहेत. सध्या स्वप्नवत वाटत असलेले पाच लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट मी लवकरच पूर्ण करेन, असा विश्वासही मी पक्षश्रेष्ठींना दिला आहे, तसाच तो जिह्यालाही देत असल्याचे पवार यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com