Pimpri-Chinchwad : विद्या चव्हाणांनी हकालपट्टी केलेल्या कविता आल्हाटांना रूपाली चाकणकरांनी 24 तासातच पदावर बसवले

NCP News: राज्यातील सात मोठ्या महिला पदाधिकाऱ्यांवर बुधवारी हकालपट्टी कारवाई करण्यात आली होती.
Vidya Chavan, Kavita Alhat, Rupali Chakankar
Vidya Chavan, Kavita Alhat, Rupali Chakankar Sarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : राज्यातील राजकीय भुंकपांची कंपने अजूनही जाणवत आहेत. त्या दिवशी राष्ट्रवादी फूट पडून बंडखोर अजित पवार गट राज्यातील भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाला. त्यानंतर या गटाला साथ देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर मूळ राष्ट्रवादीकडून (शऱद पवार गट) थेट बडतर्फीचे हत्यार उपसले जात आहे. या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना या कारवाईला अधिक संख्येने सामोरे जावे लागले आहे.

पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची त्यात पहिली विकेट पडली. त्यानंतर राज्यातील एकदम सात मोठ्या महिला पदाधिकाऱ्यांवर बुधवारी (ता.१२) ही संक्रात आली. त्यात कविता आल्हाट, वैशाली नागवडे, लोचन शिवले, शीतल हगवणे या चार पुण्यातील आहेत. आल्हाट या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा, तर हगवणे या पिंपरी-चिंचवड शहर निरीक्षक होत्या.

Vidya Chavan, Kavita Alhat, Rupali Chakankar
Cabinet Expansion : अजित पवारांनी नऊ वजनदार खाती हिसकावली; तरीही भरत गोगावले, संजय शिरसाट, बच्चू कडूंचे डोळे राजभवनाकडेच

राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी या सात जणींची परवा हकालपट्टी केली. तर, त्यानंतर २४ तासांतच आल्हाट यांना पुन्हा पिंपरी-चिंचवड महिला अध्यक्ष म्हणून अजित पवार गटाने नियुक्त केले. या गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांना नियुक्ती पत्र गुरवारी दिले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून पक्षाचे एकच लेटरहेड वापरले जात असल्याचे या बडतर्फी व नेमणुकीतून दिसून आले आहे.

"नव्या जोमाने कामाला लागू, पिंपरी महापालिकेत पुन्हा सत्तेत येऊ"

आगामी महापालिका निवडणुकीची तयारी म्हणून सर्वच राजकीय पक्षांकडून बांधणीचे काम सुरु झालेले आहे. राष्ट्रवादीही त्याला अपवाद नाही. त्यांची सदस्य नोंदणी मोहिम सुरु आहे. त्याला खीळ बसू नये, म्हणून बडतर्फीनंतर आल्हाट यांना लगेच पुन्हा त्याच पदी पक्षाने निय़ुक्ती दिली. तर, निरीक्षकांच्या नियुक्त्य़ा आठ दिवसांनी केल्या जाणार असल्याचे राष्ट्रवादीतून सांगण्यात आले.

Vidya Chavan, Kavita Alhat, Rupali Chakankar
Heramb Kulkarni On NCP : अजितदादा या प्रश्नांचे उत्तरे द्याल का? सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णींचे टोकदार सवाल!

दरम्यान, बडतर्फीनंतर २४ तासांतच पुन्हा पिंपरी-चिंचवड महिला अध्यक्षपदी नियुक्ती होताच पुन्हा जोमाने कामाने लागू आणि पिंपरी महापालिकेत पुन्हा पक्षाला सत्तेत आणू, अशी प्रतिक्रिया आल्हाट यांनी आज `सरकारनामा`ला दिली. शहर आणि परिसराचा विकास हा अजितदादांमुळे झाला असल्याने विकासाला साथ देण्याची ठरवले असल्याचे आल्हाट आणि हगवणे यांनीही दादांबरोबर जाण्यामागील कारण विशद करताना सांगितले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com