पाच वर्षांत सर्व सदस्य झाले सरपंच-उपसरपंच; प्रत्येक सदस्याला संधी मिळावी म्हणून अनोखा पॅटर्न

Pune News Kendur Gram Panchayat: पुणे जिल्ह्यातील केंदूर ग्रामपंचायतीत पाच वर्षांत प्रत्येक सदस्याला सरपंच किंवा उपसरपंच होण्याची संधी मिळाल्याचा अनोखा पॅटर्न. ग्रामीण शासनव्यवस्थेतील आगळा-वेगळा प्रयोग.
Gram Panchayat
Gram Panchayat Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचाला मोठा मान असतो. त्यामुळेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नेहमीच मोठी चुरस पाहायला मिळते. सरपंचपदाची निवडणूक ही मोठी प्रतिष्ठेची बनलेली असते. यात अनेकदा घोडेबाजार होतो तर कधी वादविवाद होऊन लहान गावात गटबाजीचे राजकारण सुरु होते, हे टाळण्यासाठी पुणे जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीने आदर्श निर्माण केला आहे .

शिरुर तालुक्यातील केंदूर ग्रामपंचायतीनं पाच वर्षांच्या कालावधीत सरपंच-उपसरपंचपदाची शक्कल लढवली आहे. या ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या सर्व सदस्यांना सरपंच-उपसरपंचपदी नियुक्त करण्यात आले. ज्यामुळे सर्वांना या पदावर काम करण्याची, गावचा कारभार हाताळण्याची संधी सर्व 17 ग्रामपंचायत सदस्यांना मिळाली.

गेल्या पाच वर्षात केंदूर ग्रामपंचायतीतील सर्व १७ सदस्यांना सरपंच वा उपसरपंचपदावर काम करण्याची संधी मिळाली असून, अशी संधी देणारे शिरूर तालुक्यातील हे एकमेव गाव ठरले आहे.

राजकारणात सक्रिय असलेल्या व्यक्तींनी आपल्या गावात राजकीय एकोपा कायम राहावा म्हणून, ग्रामपंचायतीतील सर्वांना समान संधीचा फॉर्म्युला राबवला. गावातील सर्वपक्षीय नेते-पदाधिकाऱ्यांनी पाच वर्षांपूर्वी घेतला होता. हा निर्णय प्रत्यक्षात आणण्यात गावकारभाऱ्यांना यश आले आहे.

Gram Panchayat
Shivraj Patil: राजकीय टीका अन् पाठीमागे विरोध करणे चाकूरकरांना जमलेच नाही..

सरपंच

केंदूर ग्रामपंचायत २५ जानेवारी २०२१ ला अस्तित्वात आल्यानंतर सुवर्णा सतीश थिटे, सुनील थिटे, अविनाश साकोरे, सूर्यकांत थिटे, अमोल थिटे, प्रमोद पऱ्हाड, मंगल साकोरे व अलका सुदाम पऱ्हाड अशा एकूण आठ सदस्यांना अनुक्रमे सरपंचपदाची संधी देण्यात आली.

उपसरपंच

भरत साकोरे, जयश्री सुक्रे (दिवंगत), योगिता थिटे, विठ्ठल ताथवडे, ज्योती गावडे, शालन भोसुरे, मंगेश भालेकर, कल्पना थिटे आणि सुषमा पऱ्हाड आदी नऊ सदस्यांना अनुक्रमे उपसरपंचपदाची संधी देण्यात आली आहे. केंदूर ग्रामपंचायतीचा हा पॅटर्न सगळीकडेच राबवायला हरकत नाही, असं या ग्रामपंचायतीच्या सदस्यांचं मत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com