
कुरुळी : खेड तालुक्याच्या दक्षिण भागात शिवसेना महायुतीचे उमेदवार तथा आमदार सुरेश गोरे यांनी गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून प्रचार केला. त्यास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व गावांतून त्यांची ग्रामस्थांकडून विजयी मिरवणूक काढण्यात आली.
कुरुळी, मोई, निघोजे, चिंबळी, केळगाव या गावांना भेट देत आमदार गोरे यांनी मतदारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""माझा या पाच वर्षांच्या कार्यकाळात विकासाबरोबरच तालुक्यातील नागरिकांना शांतता-समाधान मिळाले आहे. चिंबळी-कुरुळी-मोई-निघोजे परिसरातील गावांचे प्रमुख दळणवळण असणाऱ्या रस्त्यांसाठी हायब्रीड ऍन्युइटी योजनेच्या माध्यमातून 44 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून काम सुरू आहे. या रस्त्याची देखभाल पुढील 10 वर्ष संबंधित ठेकेदारावर असणार आहे, अशा पद्धतीच्या विविध कामासाठी निधी मंजूर केले आहेत.''
या प्रसंगी ज्येष्ठ नेते अशोक खांडेभराड, रिपाइंचे संतोष डोळस, पंचायत समिती सदस्य अमर कांबळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण मांजरे, शिवसेना प्रमुख रामदास धनवटे, पांडुरंग बनकर, आशिष मुऱ्हे, एकनाथ करपे, सूर्यकांत मुंगसे, शांताराम मेदनकर, गुलाब सोनवणे, संतोष शिंदे, संतोष येळवंडे, माजी सरपंच कांचन शिंदे, सुनीता येळवंडे, रामदास शिंदे, चंदन मुऱ्हे, विजय जगनाडे, श्याम बहिरट, काळुराम कड, तेजस्विनी बागडे, अश्विनी शिरवले, संदीप येळवंडे, वैभव बेंडाले, नीलेश पवार, चंद्रकांत बेंडाले, दीपक कांबळे, दीपक डोंगरे, विलास मुंगसे, शिवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.
गोरे म्हणाले, ""निघोजे हे गाव मला घरासारखे आहे. मी या भागात आमदार म्हणून कधीच आलो नाही. हक्काने ग्रामस्थांची कामे केली. स्थानिकांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न केले. गावच्या गायरान जागा विकासकामासाठी मिळाव्यात, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे.''
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.