Gopichand Padalkar On Love Jihad : कोल्हापूर-नगर 'लव्ह जिहाद' प्रकरणी पोलिसांनी योग्य कलमं लावली नाही; आरोपी मोकाट फिरतात; पडळकरांचा आरोप!

Gopichand Padalkar Stand On Love Jihad : 'MPSC विद्यार्थ्यांची प्रबोधन करण्याची गरज आहे..'
Gopichand Padalkar On Love Jihad :
Gopichand Padalkar On Love Jihad : Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : भाजपचे विधानपरिषेदेवरील आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी लव्ह जिहाद (Love Jihad) प्रकरणी मुलींना फसविण्यात आले, मात्र पोलिसांकडून या प्रकरणांमध्ये योग्य तो तपास केला जात नाही, असे म्हंटले आहे. कोल्हापूर व नगर या ठिकाणी हिंदू मुलींना फूस लावून लव्ह जिहादचा शिकार बनवण्यात आले, याच योग्य तो तपास न झाल्याने त्या न्यायापासून वंचित आहेत, याबाबत विधिमंडळात (Maharashtra Assembly) प्रश्न उपस्थित करणार आहे, असे पडळकर यांनी म्हंटले आहे. (Latest Marathi News)

Gopichand Padalkar On Love Jihad :
Madhya Pradesh Survey : मध्य प्रदेशात काँग्रेस की भाजपा? सर्व्हेतून मोठी आकडेवारी समोर

गोपीचंद पडळकर यांनी पुणे शहर भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषदे घेऊन, यासंदर्भात खुलासा केला आहे. ते म्हणाले, "कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका गावात एका तरूणीची सोशल मिडीयाद्वारे एका मौलवीचीसोबत ओळख झाली होती. याबाबत संबंधित मौलवीने त्या मुलीवर अत्याचार केल्याचे, त्या मुलीच्या आईनेच पोलिसांमध्ये तक्राप दिली आहे. पोलिसांनी या प्रकणातील आरोपीला अटक केली आहे. पण, त्याच्यावर योग्य कलमान्वये गुन्हे दाखल न केल्याने त्याची सुटका झाली. या आरोपीच्या सुटकेनंतर आता संबंधित तरूणीच्या बहिणींना त्रास दिला जात आहे. याबाबतही तक्रार करण्यात आली, मात्र पोलिसांनी पुढे कारवाई केलीच नाही, असे पडळकर म्हणाले.

असाच लव्ह जिहादचा प्रकार नगर जिल्ह्यात घडला. एका हिंदू तरूणीला एका मुस्लीम तरूणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिने एक मूल जन्माला घातल्यानंतर त्याने तिला सोडून दिले. या प्रकरणी पोलिसांकडून ऍट्रॉसिटीचे कलमान्वये गुन्हे नोंदवलेले नाही. पोलिसांच्या अशा भूमिकेमुळे आरोपी आजही खुलेआम फिरत आहेत. या दोन्ही ठिकाणच्या प्रकरणाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र देणारआहे, असे पडळकर यांनी सांगितले.

Gopichand Padalkar On Love Jihad :
Madhya Pradesh Survey : मध्य प्रदेशात काँग्रेस की भाजपा? सर्व्हेतून मोठी आकडेवारी समोर

दर्शना पवार या तरूणीच्या हत्या प्रकरणावर पडळकर म्हणाले, "दर्शना पवार हिची हत्येची दुर्दैवी घटना घडली. या हत्येपाठोपाठ पुण्यातील सदाशिव पेठ या भागात एका तरूणीवर कोयत्याने झालेला जीवघेणा हल्ला हा फारच दुर्दैवी आहे. स्पर्धा परीक्ष देण्यासाठी विद्यार्थी पुण्यात येत असतात, त्यांची संख्या पुण्यात खूप आहे. या सर्वांशी चर्चा करून, त्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे," असे गोपीचंद पडळकरांनी मत व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com