Kopardi Case : कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीची येरवडा कारागृहात आत्महत्या

Nagar News : कोपर्डी गावातील निर्घृण बलात्कार आणि खून प्रकरणातील तीन आरोपींना सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे
Yerwada jail
Yerwada jail Sarkarnama
Published on
Updated on

Nagar Crime News : नगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे याने येरवडा कारागृहात आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. कारागृहातील सेलमध्येच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. शिंदे याच्या आत्महत्येने कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात दाखल केला आहे.

13 जुलै 2016 रोजी हा दिवस नगर जिल्हा उभ्या आयुष्यात विसरू शकणार नाही. याच दिवशी कोपर्डी येथील तुकाई लवण वस्ती परिसरात नववीत शिकणारी शाळकरी मुलगी आजोबांच्या घरी मसाला आणण्यासाठी गेली होती. आजोबांच्या घरून मसाला घेऊन ती पुन्हा घरी जाताना जितेंद्र शिंदेने तिला रस्त्यात अडवले. रस्त्याच्या बाजूला असलेल्या जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केले व त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली. प्रतिकारात तिला जबर दुखापतही झाली.

Yerwada jail
Maratha Reservation News : मुख्यमंत्र्यांनी बोलवली सर्वपक्षीयांची बैठक; शिंदेंच्या बैठकीला ठाकरे उपस्थिती लावणार ?

उशीर झाला तरी मुलगी घरी आली नाही म्हणून घरच्यांनी शोध सुरू केला, पण मुलीचा मृतदेहच सापडला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती. पोलिसांनी काही तासांतच आरोपी जितेंद्र शिंदे याला श्रीगोंदा येथून ताब्यात घेतले, तर या प्रकरणात त्याला साथ देणाऱ्या संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांना चार दिवसांनी अटक केली.

Yerwada jail
Maratha Reservation News : मुख्यमंत्र्यांनी बोलवली सर्वपक्षीयांची बैठक; शिंदेंच्या बैठकीला ठाकरे उपस्थिती लावणार ?

या खटल्यात वैद्यकीय अधिकारी, पीडितेच्या मैत्रिणी, चुलत आजोबांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयाने तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तेव्हापासून हे तिघेही येरवड्याच्या कारागृहात होते. धक्कादायक म्हणजे मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याने खुनाचा आरोप अमान्य केला.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com