Koregaon Bhima Violence Case : व्हर्नन गोन्साल्वीस, अरुण फरेरा ५ वर्षांनंतर आज जेलबाहेर येणार...

Supreme Court : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाल्याचा ठपका या व्हर्नन गोन्साल्वीस, अरुण फरेरा यांच्यासह नऊ जणांवर ठेवण्यात आला होता.
Koregaon Bhima violence case
Koregaon Bhima violence case Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषद प्रकरणी व्हर्नन गोन्साल्वीस, अरुण फरेरा यांना सर्वोच्च न्यायालयाने अट आणि शर्तींच्या आधारे जामीन मंजूर केला आहे. तो जामीन मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग झाला आहे. त्यामुळे व्हर्नन गोन्साल्वीस, अरुण फरेरा यांची मुंबईच्या तळोजा जेलमधून तब्बल पाच वर्षांनंतर सुटका होणार आहे. (Koregaon Bhima violence case : Vernon Gonsalves, Arun Ferreira to be released after five years)

कोरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी (Koregaon Bhima violence) व्हर्नन गोन्साल्वीस, अरुण फरेरा हे २०१८ पासून कारागृहात होते. मुंबई उच्च न्यायालयाने (mumbai High court) त्यांचा जामीन नाकारल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली हेाती. गोन्साल्वीस आणि फरेरा यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत, पण त्या एकमेव कारणामुळे त्यांना जामीन नाकारता येणार नाही. ते गेल्या पाच वर्षांपासून कारागृहात आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन देताना म्हटले होते.

Koregaon Bhima violence case
Mahavikas Aghadi News : महाविकास आघाडीला आणखी एक धक्का; ‘या’ पक्षाने केले ‘गुडबाय’

सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर तो जामीन मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. मात्र, जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने काही अटी व शर्ती घातल्या आहेत. त्यात गोन्साल्वीस आणि फरेरा यांनी आपला पासपोर्ट पोलिसांकडे जमा करावा. आपला पत्ता आणि मोबाईल नंबर एनआयएला देण्यात यावा. आरोपींनी एकच मोबाईल वापरावा. तसेच, आठवड्यातून एकदा तपास अधिकाऱ्यांसमोर आरोपींनी हजेरी लावावी आदी अटी व शर्तींचा समावेश आहे. व्हर्नन गोन्साल्वीस, अरुण फरेरा हे २०१८ पासून कारागृहात होते. या आरोपींची आज तळोजा जेलमधून सुटका होणार आहे.

Koregaon Bhima violence case
Vidhan Parishad : महसूल विभागाचं विधेयक आलं, मात्र विखे पाटील सभागृहात गाढ झोपले होते

काय आहे प्रकरण?

कोरेगाव भीमा येथे लढाईच्या स्मरणार्थ एक जानेवारी रोजी अभिवादनाचा कार्यक्रम असतो. त्याच्या अगोदर पुण्यात एल्गार परिषद झाली होती, त्यात प्रक्षोभक भाषणे केल्यामुळे कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाल्याचा ठपका या व्हर्नन गोन्साल्वीस, अरुण फरेरा यांच्यासह नऊ जणांवर ठेवण्यात आला होता. त्याप्रकारणात गोन्साल्वीस आणि फरेरा गेल्या पाच वर्षांपासून कारागृहात होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com