Yerawada Jail News : पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कारवाईचे अनेक किस्से आहेत. त्यांची चर्चा नेहमीत होत असते. एका खून प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी गेलेले कृष्ण प्रकाश यांनी आरोपीवर झाड फेकून मारले होते. (krishna prakashs cell phone in yerwada jail to the accused who was killed by throwing a tree)
त्या आरोपीबाबतची नवी माहिती समोर आली आहे, सध्या हा आरोपी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्यांच्याकडे येरवडा कारागृहात मोबाईल आढळल्याने खळबळ उडाली आहे.
अश्विन आनंदराव चव्हाण असे त्या कैद्याचे नाव आहे. कृष्णप्रकाश यांनी पिंपरी चिंचवड शहरात पोलिस आयुक्त असताना एका घटनेदरम्यान झाड फेकून तीन आरोपींना पकडले होते. हे तिघेही सध्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत.
कारागृह प्रशासनाला शुक्रवारी अश्विन चव्हाण याच्याकडे मध्यरात्री मोबाईल आढळला. येरवडा मध्यवर्ती कारागृहातील सर्कल क्रमांक एक, बॅरेक क्रमांक एकमध्ये हा प्रकार घडला आहे. तुरुंग अधिकारी अमोल जाधव (वय ३७, रा. येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. येरवडा पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांवर गोळीबार करुन पळून जाणाऱ्या तीन आरोपींवर कृष्ण प्रकाश यांनी जवळ असलेले झाड फेकून मारले होते. त्यामुळे आरोपी खाली पडून पोलिसांच्या तावडीत सापडले, असे त्यावेळी सांगण्यात आलं होतं. कृष्ण प्रकाश यांनी झाड फेकून मारल्याने खरंच आरोपी पकडले गेले का ? असा प्रश्न देखील त्यावेळी उपस्थित करण्यात आला होता.
तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना याबाबत पत्रकारांनी विचारले होते, त्यावेळी ''कृष्ण प्रकाश यांनी झाड फेकले की नाही याबद्दल माहिती नाही, याबाबत चौकशी करतो'' असं ते म्हणाले होते.
अश्विन चव्हाण याच्याकडे मोबाईल आढळल्याने पुन्हा आज "कृष्ण प्रकाश यांनी झाड फेकून आरोपींना पकडले," या घटनेची आठवण झाली. येरवडा कारागृहात मोबाईल जॅमर आहेत की नाही, याबाबतचा प्रश्न विचारला जात आहे. येथील सुरक्षा यंत्रणाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.