Kasaba Election : कुणाल टिळकांना थेट फोन आला, तुमचं तिकिट भाजपनं फायनल केलं अन् नंतर वेगळंच घडलं !

Cyber Crime : सायबर चोरट्यांच्या 'टार्गेट'वर आता पोटनिवडणुकीतील इच्छुक
Kunal Tilak
Kunal TilakSarkarnama

अक्षय बडवे

Cyber Criminal calls to Kunal Tilak : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं डिजिटल इंडियाचं (Digital India) स्वप्न साकार होत आहे. डिजिटल इंडियामुळे सर्वसामान्यांची अनेक कामे आता चुटकीसरशी होऊ लागली आहेत. यामुळं नागरिकांच्या वेळेची आणि पैशांचही बचत होत असल्याचं दिसून येत आहे. डिजिटल इंडियाचे अनेक फायदे होत असले तरी दुष्परिणामही खूप भयानक असल्याचे स्पष्ट झालं आहे.

एकीकडं डिजिटल इंडियास प्रतिसाद वाढत असताना दुसरीकडं सायबर गुन्हेगारांनाही आपले हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. हे गुन्हेगार दररोज नवनवीन शक्कल लढवून नागरिकांना सावज करण्याचा प्रयत्न करतात. आता कसबा विधनसभेतील (Kasaba election) एका बड्या इच्छुकाला फोन करून पैशांची मागणी केल्याचं समोर आलं आहे.

सायबर गुन्हेगार (Cyber attack) फोन करून बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून नागरिकांचे बँकखाते रिकामे करीत असल्याचे अनेक प्रकार दररोज घडत आहेत. आता पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला मोर्चा इच्छुकांकडे वळविल्याचं दिसून येत आहे.

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी (Kasaba By-Election) कुणाल टिळक (Kunal Tilak) इच्छूक आहेत. त्यांना काही दिवसांपूर्वी एक कॉल आला होता. त्यावेळी त्यांना तुमचं तिकीट भाजपने निश्चित केल्यांच सांगण्यात आलं. तसेच एका बँकखात्यावर काही रक्कम पाठविण्यास सांगितल्याचं आता समोर आलं आहे.

पुण्यातील कसबा विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर सगळ्या पक्षांनी तयारी सुरू केली आहे. कुणाल टिळक हे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव आहेत. ते कसब्यातून भाजप पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांनांच काही दिवसांपूर्वी एक फोन आला होता. त्यातून त्यांच्याकडे ७६ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. यातू टिळक यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी कुणाल टिळक (Kunal Tilak) यांना एका अनोळखी व्यक्तीचाफोन आला होता. त्यावेळी ती व्यक्ती म्हणाली, "मी दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून बोलतो आहे. तुमचं आगामी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तिकीट निश्चित झालंय. तिकीट निश्चित झाल्यामुळं तुम्ही 'यूपीआय'ने या नंबरवर ७६ हजार रुपये पाठवा"

या फोनकडे मात्र कुणाल यांनी दुर्लक्ष केलं. तसेच त्या व्यक्तीला कोणताही प्रतिसाद दिला नाही. यानंतर कुणाल टिळक यांनी झालेला सर्व प्रकार पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि पक्षाला कळवला. यामुळे एकीकडे कसबा पोटनिवडणुकीसाठी सगळ्या पक्षाने तयारी केली असली तरी अशा फोन कॉल किंवा इमेल, मेसेज पासून सावध राहण्याची गरज आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com