Lalit Patil News : ड्रगमाफिया ललित पाटीलचा साथीदार अभिषेक बलकवडेच्या घरी आढळले तीन किलो सोने; पुणे पोलिसांची कारवाई

Maharashtra : भूषण आणि अभिषेक हे दोघे ललित पाटीलसोबत ड्रग्ज रॅकेट चालवत होते.
Lalit Patil News
Lalit Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Nashik : ड्रगमाफिया ललित पाटीलचा (Lalit Patil) भाऊ भूषण पाटील (Bhushan Patil) आणि त्याच्या (Sasoon Hospital Drug Racket) साथीदार अभिषेक बलकवडे यांना पुणे पोलिसांनी नेपाळच्या सीमेवरून अटक केली आहे. पुणे पोलिसांचे नाशिकमध्ये धाडसत्र सुरू आहे. ललित पाटील याच्या शोधासाठी पुणे पोलिसांची टीम नाशिकमध्ये पोहाेचली आहे. तपासात पुणे पोलिसांनी अभिषेक बलकवडे याच्या घरातून तीन किलो सोने जप्त केले आहे.

अभिषेक बलकवडे आणि भूषण पाटील यांना पोलिसांनी १४ दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाकडे मागितली होती. मात्र, न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. भूषण आणि अभिषेक हे दोघे ललित पाटीलसोबत ड्रग्ज रॅकेट चालवत होते.

Lalit Patil News
Ajit Pawar Group : अजितदादा नक्कीच 'ते' स्वप्न पूर्ण करतील; मिटकरी, चाकणकरांचा सुळेंना टोला

त्यात ललित पाटीलचा भाऊ भूषण हा ड्रग्ज तयार करण्यात तरबेज होता. त्यानं मेफेड्रोन ड्रग्ज कसं तयार करतात, याचं प्रशिक्षण घेतलं होतं. त्यानंतर हेच मेफेड्रोन अभिषेक देशात आणि भारताबाहेर विकायचा. या सगळ्या मेफेड्रोनचं डील हे ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयात बसून करत होता.

अमली पदार्थविरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या गेटवर तब्बल दोन कोटी १४ लाखांचे अमली पदार्थ पकडले होते. या वेळी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ललित पाटीलला अमली पदार्थ देण्यासाठी आलेल्या सुभाष मंडल व शेखला अटक करण्यात आली. मात्र, यानंतर ललित पाटील ससून रुग्णालयातून पोलिसांना गुंगारा देत पसार झाला. त्यानंतर ललित पाटील, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Lalit Patil News
Mahur Market Committee : बाजार समितीच्या पराभवाला जबाबदार कोण? भाजप की आमदार भीमराव केराम

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com