गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता ; पुणे पोलिस जळगावात

गिरीश महाजन (Girish Mahajan)आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी केली होती.
Girish Mahajan
Girish Mahajansarkarnama
Published on
Updated on

पुणे : जळगावमधील बहुचर्चित मराठा विद्या प्रसारक संस्थेची जागा हडप करण्यासाठी भोईट गटाला मदत करून आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan)आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी केली होती. या प्रकरणाचा तपासासाठी आता पुणे पोलिस जळगाव येथे गेले आहे.

भाजपचे आमदार, माजी मंत्री गिरीश महाजन संशयित असलेल्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांचं पथक जळगावात दाखल झालं आहे. जळगावातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा आहे. याप्रकरणी गिरीश महाजन, रामेश्‍वर नाईक, निलेश भोईटे यांच्यासह एकूण २९ जणांवर निंभोरा येथे गुन्हा दाखल करण्यात येऊन तो कोथरूडला वर्ग करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पोलिस जळगावात दाखल झाल्याने महाजन यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे.

जळगावात सकाळीच पुणे पोलिसांचे पथक आल्याचे मोठी खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वीच याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मोक्का कारवाईबाबत वक्तव्य केले होते. सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याशी याबाबत चर्चा केली असता अद्याप चौकशी सुरू असून चौकशीनंतर माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा विद्या प्रसारक वाद प्रकरणी अँड. विजय भास्कर पाटील यांनी निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुणे, कोथरूड पोलिसांचा मोठा फौजफाटा जळगावात दाखल झाला आहे. स्वारगेट विभागातील वरिष्ठ पोलिस अधिकारी या पथकात असल्याचे समजते. अ‍ॅड. विजय भास्कर पाटील मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्था जळगावचे संचालक आहेत.

हा प्रकार जानेवारी २०१८ ते जानेवारी २०२१ या कालावधीत घडला आहे. आज पहाटे कोथरूड पोलिसांचे ७० कर्मचारी, अधिकारींचे पथक जळगावात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार स्थानिक पोलिसांना सोबत घेत पुणे येथील सहा मुख्य संशयितांच्या घरी पोहचले आहे. पथक या पाचही जणांच्या घरी झाडाझडती घेणार आहेत. भोईटे आणि देशमुख यांच्या घरी पथक तळ ठोकून आहे. पोलिस या संस्थेशी संबंधित कागदपत्र, संगणक वैगरे महत्वपूर्ण पुरावे ताब्यात घेणार असल्याचे कळते.

Girish Mahajan
ममतांना गोव्यात सत्तेचं स्वप्न पडतंय, त्यांच्या प्रतिमेस शोभणारं नाही ; राऊतांनी सुनावलं

आपल्याला आरोपींनी पुण्यात संस्थेचे कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. पुण्यात आल्यानंतर शिवीगाळ करत दमदाटी केली. त्यांना गाडीत जबरदस्तीने बसवत सदाशिव पेठेत असलेल्या एका फ्लॅटवर नेले. त्या ठिकाणी मारहाण करत गळ्याला आणि पोटाला चाकू लावला. सोबत असलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीलाही त्यांनी याठिकाणी डांबले. तर सर्व संचालकांचे राजीनामे आणले नाहीत तर एमपीडीएच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी घेतली होती, असे विजय पाटील यांनी फिर्यादीत म्हटलं आहे. या प्रकरणात मोक्काअंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com