Laxman Jagtap News: ...अन् लक्ष्मणभाऊंचं मंत्री व्हायचं स्वप्नं अपूर्णच राहिलं!

Laxman Jagtap : २०१९ ला मंत्रीपदासाठी लक्ष्मण जगतापांचं नाव चर्चेत होतं.
laxman jagtap
laxman jagtapSarkarnama
Published on
Updated on

उत्तम कुटे

Bjp Mla Laxman Jagtap News: पिंपरी-चिंचवड भाजपचे माजी अध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप (वय ५९) यांचे दीर्घ आजाराने आज (दि.३) निधन झालं आहे. जगताप हे भाऊ म्हणूनच ओळखले जात होते. मात्र,मंत्री व्हायचं त्यांचं स्वप्नं अपूर्णच राहिलं आहे. त्यामुळे शहरही अद्याप मंत्रीपदापासून दूरच आहे. पात्र असूनही ते मंत्री न झाल्याची सल भाऊंचे हितचिंतक,कार्यकर्तेच नाही,तर पिंपरी-चिंचवडकरांनाही बोचत राहणार आहे.

लक्ष्मण पांडुरंग जगताप (Laxman Jagtap) यांच्याकडे कार्यकर्त्यांचं मोठं जाळं होतं. आपल्या कार्यकर्त्यालाही मोठं करणारे नेते अशी प्रतिमा होती.एरवी कार्यकर्ता हा फक्त सतरांज्या उचलण्यापुरता असतो ही बाब भाऊंच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीतमात्र अजिबात लागू होत नव्हती. गत टर्मला त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत टेल्कोच्या कामगारांना नगरसेवकच केले नाही,तर त्यांना सत्तारुढ पक्षनेता असं मानाचं पद सुद्धा त्यांनी मिळवून दिलं होतं.

राष्ट्रवादी कॉंग्रेसची १५ वर्षाची राजवट उलथवून २०१७ ला पिंपरी पालिकेत भाजपला प्रथमच सत्ता आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. पिंपरी,चिंचवड,भोसरी आणि आकुर्डी या चार गावांच्या नगरपालिकेची महानगरपालिका झाल्यानंतर १९८६ ला झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत भाऊ प्रथमच नगरसेवक म्हणून एस कॉंग्रेसकडून निवडून आले. तेथून त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. त्याचा चढता आलेख गेली ३५ वर्षे सुरुच होता.

laxman jagtap
Laxman Jagtap Death : शेतकरी पुत्र ते पिंपरीचिंचवडचे कारभारी; लक्ष्मण जगतापांचा थक्क करणारा प्रवास !

चिंचवडमधून आमदार म्हणून निवडून येण्याची २०१९ ला त्यांची हॅटट्रिक झाल्याने व चार टर्म आमदार राहिल्याने मंत्रीपदासाठी त्यांचं नाव घेतले जात होतं. त्यातून पिंपरी-चिंचवडला पहिल्यांदाच मंत्रीपद मिळणार होतं. पण,सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपची राज्यात सत्ता आली नाही. कॉंग्रेस,शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसनं महाविकास आघाडी करून सरकार स्थापन केले अन जगतापांची मंत्री व्हायची संधी हुकली.

laxman jagtap
Solapur News : काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या भावाविरोधात आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल

जगताप हे सलग वीस वर्षे नगरसेवक,तर त्यानंतर १८ वर्षे आमदार होते.२०१६ ते २०१९ असे ते पिंपरी-चिंचवड भाजपचे अध्यक्ष होते. शहरातील सांगवी येथील गणेश को ऑपरेटीव्ह बँक,न्यू मिलेनियम इंग्लिश मिडीयम स्कूल,प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्सचे ते संस्थापक, तर पतंजली योगपीठ, हरिव्दारचे ते संस्थापक सदस्य होते. सद्गगुरु वामनराव पै जीवन विद्या मिशनचे ते मुख्य सल्लागार आणि आर्ट ऑफ लिव्हींगचे आजीव सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले होते.

मितभाषी भाऊ हे हेडमास्तर होते. फिटनेसचा त्यांचा स्वतःचा फंडा होता. पोहणे, सायकलिंग आणि घोडेस्वारी त्यांचा छंद होता. १९८८ला दोन्ही कॉंग्रेसचे विलीनीकरण झाल्यानंतर १९९२ आणि १९९७ ला ते कॉंग्रेसचे नगरसेवक म्हणून जगताप निवडून आले. १९९३ला ते स्थायी समितीचे सभापती तथा अध्यक्ष झाले. २००० ला पुन्हा ते राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नगरसेवक म्हणून निवडून येताच महापौर बनले.

२००४ ला विधानपरिषदेवर अपक्ष म्हणून निवडून आले.त्यांनी कॉंग्रेसचे चंदूकाका जगताप यांचा पराभव केला.त्यानंतर २००९,२०१४ आणि २०१९ असे सलग तीनदा ते चिंचवडचे आमदार म्हणून निवडून आले. २०१४ ला भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी त्यावर्षीची लोकसभा निवडणूक त्यांनी मावळमधून शेकापकडून लढवली होती. पण,त्यावेळी त्यांचा शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी पराभव केला. त्यानंतर लगेचच ते भाजपमध्ये गेले अन चिंचवडमधून २०१४ ला विधानसभेवर निवडून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com