गंभीर गुन्ह्याचा तपास सोडून पिंपरी पोलिसांचे लक्ष दारु अन् गुटख्यावर

Crime News : कृष्णप्रकाश हे पोलिस आयुक्त असताना पिंपरी-चिंचवडमधील बेकायदेशीर धंद्यांना काहीसा आळा बसला होता.
 Pimpri police Latest News
Pimpri police Latest NewsSarkarnama

पिंपरी : कृष्णप्रकाश (Krishna Prakash) हे पोलिस आयुक्त असताना पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) बेकायदेशीर धंद्यांना काहीसा आळा बसला होता. गुन्हेगारांनी त्यांचा थोडासा धसका घेतला होता. पण, त्यांची बदली झाल्यानंतर गेल्या पावणे तीन महिन्यात शहरात पुन्हा गुन्हेगारीने उचल खाली आहे. त्यातही महिलांविषयक गुन्ह्यांत मोठी वाढ चिंतेची बाब झाली आहे. दागिने हिसकावण्याचे प्रकार पुन्हा वाढले आहेत. शहर पोलिस,(Pimpri Police) मात्र ते रोखण्याऐवजी अबकारी खाते आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे (FDA) बेकायदेशीर दारु आणि बंदी घातलेला गुटखा व सुगंधी सुपारी पकडण्याचे काम करीत आहे.

 Pimpri police Latest News
पुणे महापालिकेत खळबळ; उपायुक्तांसह पत्नी ACB च्या जाळ्यात

गंभीर अशी संघटीत गुन्हेगारी रोखण्याऐवजी पिंपरी-चिंचवड पोलिसांचे खंडणीविरोधी पथकच नाही, तर गुन्हे शाखा म्हणजे क्राइम ब्रॅंचही चाळीस लिटर गावठी दारू पकडणे, दोन बॉक्स विनापरवाना देशी विदेशी दारु हस्तगत करणे अशा चिल्लर कारवाईत गुंतलेली आहे. त्यामुळे काही स्थानिक पोलिस ठाणीही ती करु लागली आहे. दुसरीकडे चेनस्नॅचिंग आणि मोबाईल हिसकावणे, विनयभंग, बलात्कार, खून असे गंभीर गुन्हे वाढत आहेत. अशा स्थितीत प्राधान्य या गुन्ह्यांची उकल करून ते रोखण्याऐवजी दुसरीकडेच पोलिस बळाचा दुसरीकडेच भलताच वापर होत असल्याबद्दल शहरवासियांत व त्यातही महिलांत नाराजीच नाही, तर संतापाची भावना आहे. स्वेच्छेने शरीरविक्रिय हा गुन्हा नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले असले, तरी शहरातील मसाज सेंटरवर पोलिसांचे धाडसत्र सुरुच आहे. त्याबाबत समाधानकारक उत्तर पोलिसांकडे नाही. तेथे जबरदस्तीने वेश्याव्यवसाय होत असल्याचा त्यांचा दावा आहे. पण, तो न्यायालयात टिकणे कठीण असल्याचे विधीज्ञांचे मत आहे.

 Pimpri police Latest News
पाच कोटींसाठी विश्वासू साथीदारानेच केला चंद्रशेखर गुरुजींचा खून; तपासातून धक्कादायक खुलासा

भरदिवसा लुटारु महिलांच्या गळ्यातील त्यांचे सौभाग्यलेणे तथा मंगळसूत्रासह इतर दागिने हिसकावून दुचाकीवरून फरार होत आहेत. चाकरमान्यांच्या हातातील मोबाईलही दिवसाढवळ्या ते हिसकावून पळवून नेऊ लागले आहेत. त्यातही महिलांचे दागिने दुचाकीवरून येणारे चोरटे हिसका मारून नेण्याच्या प्रकारात पुन्हा वाढ झाल्याने महिलावर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. काल (ता.९) अशा दोन घटना घडल्या. त्याबाबत पोलिसांनी आज (ता.१०) माहिती दिली. मोशी येथे दुपारी चार वाजता ३२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील तीस हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसकावून नेले. तर, या घटनेच्या एक तास अगोदर निगडी -प्राधिकरणात अशीच चेनस्नॅचिंग झाली. स्कूलबसमधून आपल्या मुलाला घरी घेऊन जात असलेल्या ३२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील चाळीस हजार रुपयांची सोनसाखळी बाईकवरूनच आलेल्या दोन लुटारुंनी हिसका मारून नेली. या दोन्ही गुन्ह्यांतील आरोपी अद्याप पकडले गेलेले नाहीत. या घटना घ़डत असताना पोलिस, मात्र काल वेगळ्याच कामगिरीवर होते.

हिंजवडी फेज टू येथील माऊली स्टोर्समधून त्यांनी हुक्का पाकिटे, वैधानिक इशारा नसलेली सिगारेटची पाकिटे आणि बंदी घातलेला गुटखा पकडण्याची जबरदस्त कामगिरी पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने कामगिरी केली. तर, कालच स्पेशलाईज्ड गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने चिखलीत चाळीस लिटर गावठी हातभट्टीची दारू पकडली. या कामगिरीची माहिती पोलिसांच्या प्रसिद्धी पत्रकातून आज देण्यात आली.

 Pimpri police Latest News
धक्कादायक! मिरजेतील 9 जणांची आत्महत्या नसून हत्या; दोघांनी जेवणातून दिले होते विष

भोसरी एमआय़डीसी पोलिस ठाण्यानेही अशीच वीस लीटरची हातभट्टी पकडण्याची कारवाई काल केली. त्यात एकाला अटक करण्यात आली. तर, कालच अशाच कारवाईत व गुन्ह्यामध्ये चाकण पोलिसांनी, मात्र दोघांना समजपत्र देऊन सोडले. त्यांच्याकडून रासे, चाकण येथील सुर्या हॉटेलातून विदेशी दारूच्या ३४ विनापरवाना बाटल्या गुन्हे शाखेच्या युनीट तीनच्या पथकाने हस्तगत केल्या. याच पथकाने याच दिवशी म्हणजे काल (ता.९) कुरुळी (ता.खेड,जि.पुणे) येथे विनापरवाना ७५ देशी, विदेशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या. तर, गुन्हे शाखा युनीट एकने भोसरीत एकाकडून दोन बॉक्स देशी दारूचे पकडले. त्याबद्दल त्याला अटक करण्यात आली.

 Pimpri police Latest News
भाजपशी गद्दारी केलेल्या खडसेंकडे आज काय राहिले?

शुक्रवारी (ता.८) दोन नोकरदार तरुणांचे मोबाईल हिसकावून नेण्यात आले. त्याबाबत पोलिसांनी काल माहिती दिली. या लुटमारीच्या गुन्ह्यांनी एकीकडे पुन्हा उचल खाल्ली आहे. ते उघडकीसही आलेले नाहीत. दुसरीकडे विनयभंग, बलात्कार व खूनाच्या घटनाही शहरात वाढत आहेत. त्यांची उकल करून ते रोखण्याऐवजी पोलिस गुटखा पकड, दारू जप्त कर, मसाज सेंटरवर धाड टाक, अशी कारवाई करीत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत पोलिसांचा कामाचा प्राधान्यक्रम, तर चुकला नाही ना, अशी चर्चा शहरवासियांत सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com