केजरीवालांप्रमाणे एकेकाळी राज ठाकरेंनाही मिळाले जनतेचे प्रेम;...पण त्यांनी ‘ब्लू प्रिंट’च हरवली

आम आदमी पार्टीने अत्यल्प काळात दोन राज्यात मुख्यमंत्रीपद मिळवले आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रातील तरुणांच्या मनात केजरीवाल यांच्याविषयी आकर्षण आहे.
Aap-Ranga Rachure
Aap-Ranga RachureSarkarnama
Published on
Updated on

पुणे : केजरीवाल यांच्या सारखेच प्रेम एकेकाळी महाराष्ट्रात राज ठाकरे यांना मिळाले होते. पण त्यांची ‘ब्लू प्रिंटच’ हरवली, या शब्दात आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे (Ranga Rachure) यांनी केली आहे. ठाकरे यांचे कार्यकर्ते मनस्वी आहेत.तरुण आहेत.चिवट आहेत पण आता संभ्रमित आहेत. त्यांना आता व्हिडीओ लावायचा की बंद करायचा? हे समजेनासे झाल्याची टीकाही राचुरे यांनी केली आहे.

Aap-Ranga Rachure
प्रवीण दरेकर म्हणाले, `कर नाही त्याला डर कशाला?`

आम आदमी पार्टीने अत्यल्प काळात दोन राज्यात मुख्यमंत्रीपद मिळवले आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रातील तरुणांच्या मनात केजरीवाल यांच्याविषयी आकर्षण आहे. तरुणांना राज ठाकरे यांचेदेखील आकर्षण आहे पण कालच्या सभेने इंजिन कुठल्या रुळावर चालणार की जमिनीवर खडखडाट करत बंद पडणार असा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया राचुरे यांनी दिली आहे.

Aap-Ranga Rachure
सभेत दारुड्याची एन्ट्री होताच अजितदादा भाषण थांबवून म्हणाले, ‘तू नंतर येऊन भेट मला’!

दिल्लीपाठोपाठ पंजाब विधानसभा निवडणुकीत आपला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पंजाबी जनतेने आपला पंजाबमध्ये थेट सत्तेवर बसविले.त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा देशभर बोलबाला आहे. मध्यमवर्गीय व कनिष्ठ मध्यमवर्गीयांमध्ये तसेच तरूणांमध्येही केजरीवाल यांच्याविषयी उत्सुकता आहे.राज ठाकरे यांचेही तरूणांना आकर्षण आहे. मात्र, गुढी पाडव्यानिमित्त त्यांनी काल केलेल्या भाषणातून त्यांच्या राजकीय भूमिकेविषयी त्यांच्या पाठीराख्यांमध्ये आणखी संभ्रम निर्माण झाला आहे.

पंजाबच्या निकालानंतर केजरीवाल यांना राज्यातूनही प्रतिसाद वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आपच्या महाराष्ट्र संघटनेतही तयारी सुरू करण्यात आली आहे.राज्यातल्या येत्या महापालिका निवडणुका तसेच त्यानंतर येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुका समोर ठेऊन पक्षाकडून तयारी करण्यात येत आहे. सामान्यांच्या छोट्या-छोट्या प्रश्‍नांना घेऊन आपच्यावतीने यापुढच्या काळात रस्त्यावरची लढाई लढली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com