Sharad Pawar News : 'राज ठाकरेंच्या निर्णयात माझा काही हात नाही'; शरद पवारांची कोपरखळी!

Sharad Pawar On Raj Thackeray : शरद पवार यांच्या टोल्याने पत्रकार परिषदेत हास्याचा धबधबा...
Sharad Pawar On Raj Thackeray
Sharad Pawar On Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Pune News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (ता.9 मार्च) गुढीपाडवा मेळाव्यात राज्याच्या राजकीय परिस्थितीवर सडकून टीका केली. यामध्ये त्यांनी निवडणूक आयोगापासून ते उद्धव ठाकरे तसेच महायुती - महाविकास आघाडीतील जागावाटपावर कोपरखळ्या मारल्या. या मेळाव्यात राज ठाकरेंनी एक मोठी घोषणा केली. मला राज्यसभा नको, विधानपरिषद नको, केवळ नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा भाजपला समर्थन दिले. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar On Raj Thackeray
Mohite Patil Meet Pawar : धैर्यशील मोहिते पाटलांनी पुण्यात घेतली शरद पवारांची भेट; सांगोल्याचे देशमुखही सोबत!

शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना राज ठाकरेंच्या निर्णयाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पवार म्हणाले, "मागील दहा-पंधरा वर्षात त्यांच्या अनेक निर्णय पाहिले. कधी ते भाजपवर कठोर शब्दात टिका करायचे. कधी ते भाजपच्या विरोधात होते तर कधी ते भाजपला पाठिंबा देत होते. काल नक्की त्यांनी काय केलं किंवा त्यांना काय करायचं होतं, हे मला सांगता येणार नाही. पण असे दिसतं की, कशाची अपेक्षा न करता, भाजपशी काहीतरी जुळून घेतलंय. या बद्दल पुढील दोन तीन दिवसात आणखी स्पष्ट होईल. देशभरात अनेक संस्था काम करतात. अनेक तपास यंत्रणा काम करत आहेत. यामुळे राज ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयात मी काही केलेलं नाही. मला काही त्यांची माहिती नाही, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली.

Sharad Pawar On Raj Thackeray
Congress Vs NCP Ajit Pawar : लोकसभेत पंजा Vs घड्याळ आमना-सामना नाहीच !
Sharad Pawar On Raj Thackeray
Mahayuti BJP Politics : महायुतीत झाले १६ भिडू, लोकसभेत जमेना, विधानसभेत काय घडेल?

राज ठाकरे ही व्यक्ति कळली का?

मागच्या दहा वर्षात राज ठाकरे (Raj Thackeray) ही व्यक्ती काय आहे, हे तुम्हाला कळलं का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर पवार यांच्या उत्तराने एकच हशा पिकला. पवार म्हणाले, "मी ही सामान्य नागरीक आहे. मला काय कळणार?" पवारांच्या (Sharad Pawar) या उत्तराने पत्रकार परिषदेत एकच हास्याची लहर उसळली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com