Lok Sabha Election : महायुतीत पेच वाढला; शिवसेना, भाजपनंतर आता अजितदादांच्या राष्ट्रवादीने मावळवर ठोकला दावा

Lok Sabha Election 2024 Tussle Between Shiv Sena Ncp Bjp over Maval Constituency : मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण? शिवसेनेचे बारणे, भाजपचे भेगडे की राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा नेता?
Shrirang Barne, Sunil Shelke
Shrirang Barne, Sunil ShelkeSarkarnama

Maval Lok Sabha Matdar Sangh Politics : शिवसेना शिंदे गटाचे मावळचे दोन टर्मचे खासदार श्रीरंग बारणे यांनी हॅट्ट्रिकसाठी 2024 च्या लोकसभा निवडणुकीला महायुतीकडून आपली उमेदवारी अगोदरच जाहीर केली आहे. त्यानंतर तेथून माजी मंत्री भाजपचे बाळा भेगडे यांनीही सोमवारी (ता.27) शड्डू ठोकत लढण्याची तयारी दाखवली, तर आज (ता.28) राष्ट्रवादी कॉंग्रेसने (अजित पवार गट) या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला सहा महिन्यांचा वेळ असताना तसेच ती जाहीर झालेली नसतानाही मावळात उमेदवारीवरून युतीत महाकलगीतुरा रंगला आहे.

Shrirang Barne, Sunil Shelke
loksabha election : मावळ लोकसभेसाठी महायुतीत पेच; बारणेनंतर भाजपचे भेगडेही तयारीत

युतीतील तिन्ही पक्षांनी मावळवर क्लेम केल्याने तेथील 2024 च्या लोकसभेच्या उमेदवारीचा मोठा पेच 2023 लाच निर्माण झाला आहे. अजित पवार राष्ट्रवादी गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आज पत्रकार परिषद घेत ही जागा पक्षाला मिळाली पाहिजे, अशी मागणी केली. या मतदारसंघात पक्षाची मोठी ताकद असल्याने ती मिळावी म्हणून आठ दिवसांत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह युतीच्या नेत्यांपुढे ही मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी मी इथे (विधानसभेला) समाधानी असून, लोकसभा लढणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार बारणे यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी मागण्यापूर्वी आपल्या नऊ वर्षांच्या कामाचा लेखाजोखा द्यावा. मावळ तालुक्यात काय कामे आणली, कोणत्या मोठ्या योजना आणल्या, किती निधी आणला? हे जनतेसमोर मांडावे, असे आव्हान देत आमदार सुनील शेळकेंनी एकप्रकारे बारणेंच्या उमेदवारीला विरोधच केला. मोदी लाटेवर उमेदवारी मागणे आणि निवडून येणे आता सोपे राहिलेले नाही, असे सांगत त्यांनी बारणेंना डिवचले. तसेच दोन्ही टर्मला ते मोदी करिष्म्यामुळे निवडून आले, हे त्यांनी आवर्जून सांगितले.

श्रीरंग बारणेंनी अगोदरच आपली उमेदवारी जाहीर करून टाकली आहे, याकडे आमदार शेळके यांचे लक्ष वेधण्यात आले. उमेदवारी मिळाली म्हणजे निवडून आलो असे होत नाही, असे आमदार शेळके म्हणाले. तसे स्वप्नही त्यांनी पाहू नयेत. मोदी लाटेत आले. या वेळी पुन्हा लॉटरी लागेल हा संभ्रम काढून टाकावा, असा टोला आमदार शेळके यांनी लगावला. मावळ लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीची पकड असल्याने ही जागा पक्षाला मिळावी हा आमचा हट्ट आहे, असे आमदार सुनील शेळके म्हणाले.

Edited By Sachin Fulpagare

Shrirang Barne, Sunil Shelke
Maval Loksabha News: राष्ट्रवादीचा मावळ लोकसभेवर दावा; ठाकरे गट तो मान्य करणार का ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com