Pune News : महाराष्ट्रात महाविकास आघाड़ीबरोबर लोकसभा निवडणुकीत आघाडी करण्याची बोलणी फिस्कटल्याने वंचित बहुजन आघाडीने राज्यात स्वतंत्रपणे लढण्याचे ठरवले आहे. त्याचवेळी त्यांनी काही जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला समर्थन दिले. मात्र, हा पाठिंबा त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला दिलेला नाही. त्यामुळे त्याची आता जोरदार चर्चा आहे. (Lok Sabha Election 2024)
वंचितने आतापर्यंत आपल्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत, तर पाच जागांवर अगोदरच त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. काल त्यांनी बारामतीत तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना जाहीर केला. मात्र, त्यांच्याच पक्षाचे म्हणजे आघाडीचे शिरूरमधील उमेदवार डॉ. अमोल कोल्हेंना त्यांनी पाठिंबा दिलेला नाही, हे विशेष. उलट तेथे त्यांच्याविरोधात मंगलदास बांदल हे आपले उमेदवार दिले आहेत. त्यामुळे कोल्हेंच्या काही मतांवर गदा येणार हे निश्चित.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ठाकरे शिवसेना व त्यातही त्यांचे नेते संजय राऊतांमुळे आघाडीत एन्ट्री होऊ न शकल्याच्या समजातून त्यांना पाठिंबा न देण्याची खेळी वंचितने खेळल्याचे समजते. त्यातूनच त्यांनी मावळ मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचे संजोग वाघेरे-पाटील यांना समर्थन अद्याप दिलेले नाही. उलट तेथेही ते शिरूरसारखा उमेदवार देण्याची चाल करतात का? याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, एकूणच आघाडीला सरसकट पाठिंबा न देता तो अंशतः देण्याच्या वंचितच्या भूमिकेची चर्चा झाली नसती, तरच नवल. त्यातून त्यांनी सोईचे राजकारण केल्याचे ऐकायला मिळाले. कारण गतवेळी ते 58483 च्या लीडने विजयी झाले होते, तर त्याअगोदरच्या 2014 च्या निवडणुकीत विजयी आढळरावांचे ते तब्बल 3 लाख 1 हजार 806 एवढे होते.
तर आता वंचितच्या एन्ट्रीने शिरूरमध्ये गतवेळपेक्षा लीड हे आणखी कमी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे य़ा वेळी तेथे निसटता विजय आणि पराभव होणार आहे. एकूणच पुणे जिल्ह्यात एका ठिकाणी (शिरूर) आघाडीविरोधात उमेदवार, तर दुसरीकडे (मावळ) अद्याप त्यांनी तो न दिल्याने त्यांच्या या ठिकाणी अंशतः पाठिंबा आणि विरोधी भूमिकेची चर्चा झाली नसती, तर नवलच.
उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पार्टीच्या विधानसभेतील सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग वंचितने महाराष्ट्रात लोकसभेला या वेळी केल्याचे दिसून आले आहे. कारण त्यांच्या कालच्या पाच जणांच्या दुसऱ्या यादीत तीन मराठा आणि एक मुस्लिम आणि एक लिंगायत आहे. मराठा आऱक्षण (Maratha Reservation) आंदोलन, मराठा समाजाने सत्ताधाऱ्यांविरोधात उघडलेली आघाडी याचा फायदा घेण्यासाठी वंचितने पाचमध्ये तीन मराठा उमेदवार काल दिले असल्याची चर्चा आहे.
त्यामुळे पु्णे आणि शिरूरच्या (Shirur) लढती आता दुरंगीच्या तिरंगी झाल्या आहेत. त्यातही पुण्यात वसंत मोरेंना त्यांनी तिकीट दिल्याने ती राज्यात लक्षवेधी झाली आहे, तर शिरूरमध्येही मंगलदास बांदल या त्यांच्या उमेदवारामुळे ट्विस्ट आला असून, तेथे अगोदरच घासून होणारी ही लढाई त्यातही आघाडीच्या दृष्टीने आणखी टफ झाली आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.