Lok Sabha Pimpri : 'चार सौ पार'साठी बंद भोंगा सुरू करण्याचे काम चाललंय', सचिन अहिरांचा भाजपवर हल्लाबोल

Sachin Ahir Allegation on BJP ANd MNS : देशात एकच झेंडा आणि एकच नेता राहील अशी भीती व्यक्त केली जात आहे. बंद भोंगा सुरू करण्याचे काम चाललंय, असा हल्लाबोल अहिरांनी मनसेला MNS सोबत घेण्याच्या भाजपच्या हालचालींवर केला.
Sachin Ahir
Sachin AhirSarkarnama
Published on
Updated on

Pimpri - Chinchwad : 'मावळ'मध्ये आघाडीचा पहिला मेळावा रविवारी 7 एप्रिलला पिंपरी-चिंचवडमध्ये झाला. त्यात राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे Shashikant Shinde तसेच ठाकरे शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर Sachin Ahir यांच्या तोफा युती आणि त्यातही भाजपवर धडाडल्या. बंद भोंगा सुरू करण्याचे काम चाललंय, असा हल्लाबोल अहिरांनी मनसेला MNS सोबत घेण्याच्या भाजपच्या हालचालींवर केला.

देशात एकच झेंडा आणि एकच नेता राहील, अशी भूमिका सध्या घेतली जात असल्याचे सांगत अहिर यांनी भाजप आणि मोदींना लक्ष्य केलं. हे तुम्हाला चालणार आहे का अशी विचारणा करीत या निवडणुकीत ही चाल रोखायची आहे, असे त्यांनी सांगितले.`चार सौ पार`साठी भाजपचा सध्या आटापिटा सुरू असून, त्यासाठी बंद पडलेला भोंगा सुरू करण्याचे काम त्यांचे चाललं आहे, असा हल्लाबोल अहिरांनी Sachin Ahir केला. मतदारसंघातील उद्योग (तळेगावातील फोक्सवॅगन) गुजरातला नेला तरी स्थानिक मावळचे खासदार हे तोंडात बोटे घालून गप्प होते, अशी तोफ त्यांनी श्रीरंग बारणेंवर डागली.

Sachin Ahir
Satara Lok Sabha Election 2024 : साताऱ्यातील इच्छुक थेट पवारांनाच म्हणाला, 'कुणी उमेदवार भेटतोय का नाही, तर मी आहेच'

युतीचे पैसे घ्या, पण आघाडीला मतदान करा, असे आवाहन वाघेरेंनी या वेळी केले. आपण साडेपाच लाखांच्या लीडने विजयी होऊ, असा मोठा दावाही त्यांनी ठोकला, तर आमचं हिदुत्व जानवं, शेंडीचे नाही, तर तरुणांना काम, कार्यकर्त्यांना संधी देणारं आहे, असे चाबूकस्वार म्हणाले. या लोकसभेला भाजप, अजित पवार गट (Ajit Pawar) आणि शिंदे गटाला मतदारच हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असा दावा त्यांनी केला.

'मावळ'मधील महाविकास आघाडीचे (ठाकरे शिवसेना) उमेदवार संजोग वाघेरे-पाटील (Sanjog Waghere) 23 तारखेला अर्ज भरणार असून, त्यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे खास उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अहिर यांनी या वेळी दिली. पिंपरीचे

पक्षाचे माजी आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, स्वराज इंडियाचे नेते मानव कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे Tushar Kamathe, ‌‌महिला अध्यक्षा ज्योती निंबाळकर Jyoti Nimbalkar, युवक अध्यक्ष इम्रान शेख, आम आदमी पार्टीचे पदवीधर सेलचे प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे, मावळ लोकसभा प्रचारप्रमुख योगेश बाबर, संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष सतीश काळे Satish Kale आदी या वेळी उपस्थित होते.

Edited By : Rashmi Mane

R

Sachin Ahir
Lok Sabha Constituency Thane : ये कहां आ गये ‘हम’…भाजपचा ‘डबल रोल’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com