Ajit Pawar News : 'बारामती'वरून अडचणीत आणणाऱ्या शिवतारेंवर अजितदादा पहिल्यांदाच बोलले पण एकदम थेटच; 'आम्ही पण अरेला कारे...!'

Ajit Pawar On Vijay Shivtare : 'वरिष्ठांचं ऐकायचं, की नाही ऐकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न,' असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
ajit pawar
ajit pawarsarkarnama

Baramati Loksabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना, विजय शिवतारेंबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर एक सूचक विधान केल्याचं दिसून आलं. बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर विजय शिवतारे ठाम आहेत. त्यामुळे अजित पवार गटाचे नेते शिंदेंच्या शिवसेनेवर नाराज आहेत.

या पार्श्वभूमीवर माध्यम प्रतिनिधीने शिवतारेंचा फटका बारामती मतदारसंघात बसेल का? असा प्रश्न विचारला असता, उपमुख्यमंत्री अजित पवार यावर म्हणाले, 'मला अद्याप काहीही माहीत नाही, मी चॅनेलवरच बघितलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Ekanth Shinde) यांनी त्यांना काहीतरी आवाहन केलेलं आहे. आता वरिष्ठांचं ऐकायचं, नाही ऐकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ajit pawar
Lok Sabha Election 2024 : जुन्या गोष्टी विसरू नका! शिवतारे पवारांविरोधात आक्रमक, बड्या नेत्याला घातलं साकडं

याचबरोबर 'आम्हाला वातावरण खराब करायचं नाही. आम्हीपण अरेला कारे करू शकतो. परंतु मला महायुतीमधील वातावरण खराब न करता. निवडणुकीला सामोरं जायचं आहे. कारण, मी काही वक्तव्य केलं की, त्याचा फार विपर्यास केला जातो. आम्हाला कायदा सुव्यवस्था नीट ठेवून या निवडणुका पार पाडायच्या आहेत. वातावरण चांगलं ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे,' असा सूचक इशाराही अजित पवारांनी(Ajit Pawar) या वेळी दिला.

याशिवाय, 'जे आमच्यासोबत येतील त्यांना आम्ही आमच्याबरोबर घेऊन जाऊ. ४८ पैकी ८० टक्के जागांचा निर्णय झालेला आहे, २० टक्के जागांबाबतचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. त्याबाबत आम्ही चर्चेला बसू. ही काही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही,' असंही अजित पवारांनी सांगितलं.

ajit pawar
Loksabha Election 2024 News : ...म्हणून युगेंद्र पवारांना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा घेराव

तसेच 'ही देशाच्या १४० कोटी जनतेचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. आपण त्या दृष्टीने या निवडणुकीकडे बघूयात, मी तरी तसंच या निवडणुकीकडे बघतो आहे. मार्ग काढत असताना जे प्रतिसाद देतील त्यांना बरोबर घेऊन जाऊ, जे प्रतिसाद देणार नाहीत. त्यांच्याबद्दल त्या संबंधित पक्षाचे नेते निर्णय घेतील,' असंही अजित पवारांनी या वेळी सांगितलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com