Loksabha Election Voting : पुणे, शिरुर अन् मावळमध्ये कोण बाजी मारणार? जाणून घ्या, किती झाले मतदान!

Pune Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांमध्ये मतदान झाले.
Pune Loksabha Election
Pune Loksabha Election Sarkarnama

Loksabha Election 2024 :लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज देशभरात एकूण 96 ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचा समावेश आहे. मतदान करण्याचा कालावधी संपला असून, आता अंतिम आकडेवारी समोर येत आहे.

दरम्यान मतदानाची पाच वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आली असून महाराष्ट्रात एकूण 52.49 टक्के मतदान झाले होते. तर पुणे जिल्ह्यातील पुणे, मावळ, शिरुर लोकसभा मतदारसंघाची पाच वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune Loksabha Election
Shirur Lok Sabha Constituency : 'कोल्हे म्हणजे केवळ राऊंड मारणारे खासदार तर मी...' ; आढळराव पाटलांचा टोला!

पुणे -

पुणे लोकसभा मतदारसंघात पाच वाजेपर्यंत 44.90 टक्के मतदान झाले होते. यामध्ये कसबा पेठ विधानसभा - 51.07 टक्के, कोथरूड - 48.91 टक्के, पर्वती - 48.80 टक्के, पुणे कॅन्टोन्मेंट - 44.01 टक्के, शिवाजीनगर - 38.73 टक्के, वडगाव शेरी - 40.50 टक्के

पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीने भाजपचे मुरलीधर मोहोळ(Muralidhar Mohol) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते आणि त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने काँग्रेसेचे कसबा मतदारसंघाचे आणदार रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली होती. येथील लढतीकडे सुद्धा अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष होते. कारण, दोन्ही राजकीय पक्षांनी प्रचारासाठी जोर लावल्याचे दिसून आले होते. भाजपच्या उमेदवारासाठी तर पंतप्रधान मोदींना या ठिकाणी सभा घ्यायला लावली. तर काँग्रेसने विदर्भातील 10 आमदारांना पुण्यात तळ ठोकायला लावले होते.

शिरुर -

शिरूर लोकसभा मतदारसंघात पाच वाजेपर्यंत 43.89 टक्के झाले होते यामध्ये, आंबेगाव - 53.71 टक्के, भोसरी - 42.24 टक्के, हडपसर - 38.04 टक्के, जुन्नर - 47.31 टक्के, खेड आळंदी - 48.07 टक्के, शिरूर - 41.15 टक्के

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर तयार झालेले दोन गट म्हणजे शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात शिरुर लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळाली. अमोल कोल्हेंच्या पराभवाचा विडा उचललेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या ठिकाणी संपूर्ण ताकद लावली होती. तर खासदार अमोल कोल्हे(Amol Kolhe) यांनीही सडेतोड आरोप-प्रत्यारोप करत शेवटपर्यंत ही निवडणूक रंगतदार ठेवली. शिरुरमध्ये महाविकास आघाडीमधील शरद पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात महायुतीने आढळराव पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.

Pune Loksabha Election
Murlidhar Mohol Vs Ravindra Dhangekar : मतदान संपण्याआधीच पुण्यात झळकले भावी खासदाराचे बॅनर!

मावळ -

मावळ लोकसभा मतदारसंघात पाच वाजेपर्यंत 46.03 टक्के मतदान झाले होते. यामध्ये चिंचवड - 43.33 टक्के, कर्जत - 49.04 टक्के, मावळ - 50.12 टक्के, पनवेल - 42.24 टक्के, पिंपरी - 42.20 टक्के, उरण - 55.05 टक्के

याशिवाय मावळ मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर या ठिकाणी विजयाची हॅटट्रिक करण्याचा निर्धार महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केला होता. या ठिकाणी त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांना उमेदवारी दिली गेली होती. शिवसेनेतील फुटीनंतर श्रीरंग बारणे(Srirang Barne) यांनी उद्धव ठाकरेंचा साथ सोडून एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात बारणे हॅटट्रिक करणार की ठाकरे गट शिंदेंना धक्का देणार हे पाहावे लागणार आहे.

(Ediyted by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com