Love Jihad Act : गो हत्या,लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी आणि तसेच, हिंदू धर्मीयांवरील अन्याय-अत्याचारविरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये आणि अमरावती येथे मोर्चा काढण्यात आला. सर्व हिंदूत्ववादी संघटना आणि हिंदूत्ववादी विचारांचे लोक या मोर्चात सहभागी झाले होते.
पिंपरीतील लहुजी वस्ताद, साळवे स्मारक चिंचवड येथून रविवारी सकाळी दहा वाजता विराट मोर्चास प्रारंभ झाला. त्पिंपरी-चिंचवड शहरासह निगडी, चिखली प्राधिकरण, देहू , आळंदी नगरपालिका, देहूरोड कॅन्टोन्मेंट क्षेत्र, हिंजवडी, गहुंजे येथील नागरिकांसह विविध राजकीय पक्ष, संघटना, संस्था, हिंदुत्ववादी कार्यकर्ते, गणेश मंडळे, प्रतिष्ठानचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.
देशातील सर्व राज्यांमध्ये लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा पारित व्हावा यासाठी खासदार नवनीत रवी राणा लोकसभेत आवाज उचलणार आहेत. आज अमरावती मध्ये लव्ह जिहाद विरोधी कायदा व्हावा, या मागणीसाठी विविध हिंदुत्ववादी धार्मिक व सामाजिक संघटनाच्या वतीने आयोजित मोर्चात नवनीत रवी राणा सहभागी झाल्या.
हिंदू मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून जबरदस्तीने त्यांच्यासोबत विवाह करतात, त्यांचा छळ करून त्यांचे आयुष्य उध्वस्त करतात, या लव्ह जिहाद ला कायमचा आळा बसावा असे म्हणत, यासाठी कठोर कायद्याची गरज असल्याची मागणी नवनीत रवी राणा यांनी यावेळी केली.
तसेच हिंदुत्व रक्षणासाठी आपण मैदानात उतरले असून, धर्मरक्षणार्थ आपण सदैव कटीबद्ध असल्याचेही रवी राणा यांनी यावेळी केले. हातात भगवा ध्वज घेवून, मोर्चात नवनीत राणा (Navneet Rana) चालत होत्या.संसदेचे अधिवेशन सुरू असतांनाही, या मोर्चात सहभागी होण्यासाठी खासदार राणा या दिलीवरून अमरावतीत आल्या होत्या
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सिनेमातून केला जाणारा हिंदू देवी-देवता विटंबना किंवा हिंदूंच्या धार्मिक भावना दुखविणारे वक्तव्य कदापिही सहन केले जाणार नाही, असा इशाराही यावेळी खासदार राणा यांनी यावेळी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.