माधुरी मिसाळ यांच्या घोषणेनं आढाळरावांच वाढलं टेन्शन

Shivaji Adhalrao Patil : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार निवडून येईल...
Shivajirao Adhalrao Patil Latest News
Shivajirao Adhalrao Patil Latest Newssarkarnama
Published on
Updated on

शिरूर : अगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार निवडून येईल,असा विश्वास शिरुर लोकसभा निवडणूक प्रभारी व भाजप आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी व्यक्त केला. त्या केंद्रीय मंत्री रेणुका सिंग यांच्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील तीन दिवसीय दौऱ्याबद्दल पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

दरम्यान मिसाळ यांनी केलेल्या घोषणेमुळे शिवसेनेचे माजी खासदार मात्र सध्या शिंदे गटात गेलेले नेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांचं टेन्शन वाढलं असणार आहे. मिसाळ यांनी आज (ता.११ सप्टेंबर) केलेल्या या घोषणेमुळे परिसरात कुजबुजही सुरू झाली असून राजकीय चर्चाही रंगत आहेत. (Shivajirao Adhalrao Patil Latest News)

Shivajirao Adhalrao Patil Latest News
दुपारची झोप टाळून उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना वेळ दिला; शिंदे गटाची खोचक टीका

भाजप-शिवसेना युती असताना शिरूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा होता. सलग तीन वेळा आढळराव पाटलांनी याच मतदारसंघातून विजय मिळवत ते खासदार राहिलेले होते. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला. यामुळे आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढळराव हे शिरूर लोकसभा मतदारसंघात जोर लावताना दिसत आहेत. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी स्थापन केल्याने आढळरावांची गोची झाली होती.

महाविकास आघाडी म्हणून लोकसभा लढवायची झाल्यास विद्यमान खासदारास संधी दिली जावू शकते, ही सारखी भीती आढळरावांना होती. यामुळेच राज्यात महाविकास आघीडी असतानाही आढळराव आणि खासदार डॅा.कोल्हे यांच्यात सख्य नव्हते. त्यांच्यात सारखे खटके उडत होते आणि एकमेकांना आव्हानाची भाषा केली जात होती. आढळरावांची समजूत आणि दिलासा देण्यासाठी शिवसेनेकडून त्यांना सबूरिचा सल्ला दिला जात होता. यामुळे ते कमालीचे अस्वस्थ होते. त्यातच त्यांना संजय राऊतांनी आढळरावांना पुणे लोकसभा लढवण्याची ऑफर दिल्याने त्यात आणखीनच भर पडली.

Shivajirao Adhalrao Patil Latest News
ठरलं.. सेना भवनापासून हाकेच्या अंतरावर सुरू होणार शिंदे गटाचे शिवसेना भवन

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेने सोबत केलेला बंडामुळे राज्याच्या राजकारणाची समीकरणंच बदलली. यामध्ये काही दिवस आढळरावांनी संयम ठेवला मात्र, सामनातून हकालपट्टीची बातमी आल्याने त्यांनी शिंदे गटाशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न केला आणि आपलं राजकीय भवितव्यासाठी शिंदे गटात सामील झाले होते. मात्र, आता भाजकडून शिरूर मतदारसंघावर करण्यात आलेल्या दाव्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यामुळे आढळराव समर्थकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आमदार मिसाळ यांनी केलेल्या घोषणेमुळे आढळराव हे शिंदे गटाचे उमेदवार असणार की भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार अशीही चर्चा रंगत आहे. मात्र, भाजपचे राजकारण बघता त्यांनी धक्कातंत्र वापरलं आणि आढळराव यांच्या ऐवजी नवीन चेहऱ्याला संधी दिल्यास आढळरावांवर ना घर का ना घाट का, अशी परिस्थिती ओढावू शकते. यामुळे आढळराव समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com