Maharashtra State Budget Session 2024 : महाराष्ट्राचे अंतरिम बजेट राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी (ता.27)सादर झाले. त्यात बार्टी (डॉ.बाबासाहेब रिसर्च अॅन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट)च्या धर्तीवर राज्यात आर्टी (अण्णाभाऊ साठे रिसर्च अॅन्ड ट्रेनिंग इन्टिट्यूट) स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यासाठी पाठपुरावा करणारे अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष भाजपाचे नेते अमित गोरखे यांनी महायुती सरकारला धन्यवाद दिले.
राज्यातील 59 अनुसूचित जातींसाठी बार्टी`ची स्थापना करण्यात आली आहे. मात्र,मातंग समाजाला तिचा फायदाच होत नसल्याने `बार्टी च्या धर्तीवर `आर्टी`स्थापन करण्याची मागणी पुढे आली. त्यासाठी गोरखेंसह मातंग समाजाच्या इतर नेत्यांचाही गेली कित्येक वर्षे पाठपुरावा सुरु होता. गोरखे हे फडणवीसांच्या(Devendra Fadnavis) विश्वासातले असल्याने हे प्रयत्न सफल झाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मागील कित्येक वर्षांची मातंग समाजाची मागणी अखेर पूर्ण झाली. त्यामुळे की काय गोरखेंनी राज्य सरकारला धन्यवाद देताना ते फडणवीसांना खास दिले. पुढील भवितव्याचा मोठा विचार करून मांडलेला उत्तम अर्थसंकल्प, अशी प्रतिक्रिया त्यांनी राज्याच्या बजेटवर दिली.
`आर्टी`च्या स्थापनेसाठी 11 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे मातंग समाजातून पहिला आयएएस आता होणार आहे, असा विश्वास गोरखे यांनी या घोषणेवर सरकारनामाशी बोलताना व्यक्त केला. कारण एकही आयएएस नसणे ही मातंग समाजाची शोकांतिंका आहे, असे ते म्हणाले. समाजाच्या सर्वांगीण विशेषतः शैक्षणिक विकासासाठी आर्टीची स्थापना व्हावी, ही मातंग समाजाची मागणी मान्य झाल्याबद्दल त्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले. त्यामुळे दूरगामी बदल मातंग समाजात घडणार असल्याने त्यासाठी लढा दिलेल्यांनाही त्यांनी धन्यवाद दिले.
फडणवीस मुख्यमंत्री असताना पिंपरी-चिंचवडकर गोरखेंना राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र, त्यांना अल्पकाळ मिळाला. त्यातही त्यांनी अगोदरच्या अध्यक्षांच्या काही शेकडो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराने गाजलेल्या या महामंडळाला त्यातून बाहेर काढत दिशा देण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला होता.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.