Amol Mitkari News : मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन भाजपाने मोठा प्लॅन आखला आहे. राज्यपालांना वादग्रस्त विधानं करायला लाऊन महाराष्ट्राचे लक्ष दुसरीकडे भरकटविण्यासाठी तयार केलं. मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच राज्यपाल बदलाची ठरवून केलेली ही भाजपाची खेळी आहे. असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
राजगुरुनगर येथे साहेबराव बुट्टेपाटील स्मुर्ती व्याख्यानमाला कार्यक्रमात उज्ज्वल भारताचे कालचे आजचे आणि उद्याचे स्वप्न या विषयावर मिटकरींनी व्याखान दिले.कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टिका केली आहे. राज्य सरकार स्थापनेची राजभवनात नोंद नसल्यावरुन अमोल मिटकरींनी भाजपावर निशाणा साधला आहे.
राजभवनात सत्ता स्थापनेबाबत कोणतेही कागदपत्र नसतील तर ही गंभीर बाब आहे. पण जर राज्यपालांकडूनच घटनेची पायमल्ली झाली असेल तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. राजभवनात सत्तास्थापनेची नोंद नसणे आणि राज्यपालांचं जाणं हा योगायोग नाही तर हे ठरवून केलं जात आहे.
राज्यपालांच्या विरोधात संपुर्ण मुंबईची जनता रस्त्यावर आली होती. त्यांच्या मनात राज्यपालांविषयी राग आहे. हा रोष कमी करण्यासाठी आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडांवर आल्याने भाजपने ही ठरवून खेळी केली असल्याचा आरोप यावेळी मिटकरींनी केला आहे. राज्यपालांनी महाराष्ट्रात करमत नसल्याचे पत्र पंतप्रधानांना दिलं, हे पत्र राष्ट्रपतींना द्यायला हवं होतं. राज्यपालांची हकालपट्टी व्हायला पाहिजे होती. पण राज्यपालांना साडीचोळीचा मान देऊन पाठविण्याचे काम सुरु आहे.
उज्वल भारताचे स्वप्न कसे असेल, असा सवाल मिटकरींना विचारल्यावर ते म्हणाले की, ज्या दिवशी भारतातील फॅसिझम संपेल, त्या दिवशी उज्वल भारताचे स्वप्न पुर्ण होईल. फुले, शाहु, आंबेडकर, नेहरुंनी ज्या भारताचं स्वप्न पाहिलं होतं ते आता धुळीस मिळालं आहे. कालचा भारत खुप चांगला होता. पण आजचा भारत काही लोकांनी दुषित केला. जर हेच वातावरण राहिलं तर भारत आणखी दुषित होईल. कधी हिंदू-मुस्लिम राजकारण, कधी रंगावरुन राजकारण, कधी जातीवरुन राजकारण, पण जाती धर्माच्या पुढेही भारत आहे. पण दुषित करणाऱ्यांनी तो दुषित केलाय. सत्तेत बसणाऱ्या लोकांनीच तो दुषित केलाय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.