MPSCची मोठी घोषणा : PSI पदाची परीक्षा पुन्हा लांबणीवर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ठरवलेल्या वेळेतील पोलीस उपनिरीक्षकसाठीच्या (PSI) शारीरिक चाचणी आणि मुलाखतींचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे.
police
policesarkarnama
Published on
Updated on

पुणे : मुंबईसह संपुर्ण राज्यात अवकाळी पाऊस पडतो आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या अवकाळी पावसाचा फटका आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांनाही बसला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ठरवलेल्या वेळेतील पोलीस उपनिरीक्षकसाठीच्या (PSI) शारीरिक चाचणी आणि मुलाखतींचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत परिपत्रक काढले आहे. आपल्या टि्वटर हॅडलवरुन याबाबतची माहिती दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या या पत्रकामध्ये पोलिस उपनिरीक्षकसाठीच्या पुणे केंद्रावरील दोन दिवसांच्या आणि कोल्हापूर केंद्रावरील एक दिवसाच्या शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा कार्यक्रम पुढे ढकलला असल्याचे सांगितलं आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०१९(पोलीस उपनिरीक्षक)च्या लेखी परीक्षा ३ ऑगस्ट २०२१ रोजी जाहीर करण्यात आल्या आहेत. सुधारित निकालाच्या आधारे शारीरिक चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांचा प्रथम टप्प्यातील कोल्हापूर, पुणे व नाशिक या केंद्रांवरील शारीरिक चाचणी व मुलाखतीचा कार्यक्रम संदर्भित दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे, असे या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

police
मोदी सरकारची मोठी घोषणा ; JET नोकरी भरतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र

पुणे व कोल्हापूर येथे होत असलेल्या अवकाळी पावसामुळे पुणे केंद्रावरील दिनांक १ व २ डिसेंबर या कालावधीतील तर कोल्हापूर केंद्रावरील २ डिसेंबरच्या शारीरिक चाचणी आणि मुलाखतीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच कोल्हापूर केंद्रावरील दिनांक २ डिसेंबरचा अपिलाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. या कालावधीतील उमेदवारांचा शारीरिक चाचणी व मुलाखतीचा तसेच अपिलाचा सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

पीएसआय पदाची मुख्य परीक्षा 2019 मध्ये झाली होती. त्यानंतर आतापर्यंत म्हणजेच तब्बल दोन वर्षांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती. कोरोना, मराठा आरक्षण, अवकाळी पाऊस यामुळे ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com