पेपर फुटीप्रकणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेंना अटक

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Ameetabh Gupta) यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Tukaram Supe 

Tukaram Supe 

पुणे : पेपरफुटी प्रकरणात (Maharashtra Government examination paper leak case) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe ) यांना अटक करण्यात आली आहे. टीईटी परीक्षांमध्ये झालेल्या गैरप्रकाराच्या संदर्भात पुणे पोलिसांच्या सायबर सेलने (Pune Police Cyber Cell) तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावले होते. याचौकशीनंतर तुकाराम सुपेंना पोलिसांनी अटक केली.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Ameetabh Gupta) यांनी याबाबत माहिती दिली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचा आरोप सुपेंवर करण्यात आला आहे. दरम्यान, याच प्रकरणात पोलिसांनी म्हाडा पेपरफुटीचा सूत्रधार डॉ. प्रितीश देशमुख याच्या घराची झाडाझडती घेतली असता प्रितेशकडे टीईटीच्या चाळीस आपात्र विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे आणि टीईटीचे 50 ओळखपत्र मिळाले आहेत.

<div class="paragraphs"><p>Tukaram Supe&nbsp;</p></div>
अजित पवार बदलणार आज भुसावळ पालिकेतील राजकीय समीकरणे

21 नोव्हेंबर रोजी टीईटीची परीक्षा झाली होती. टीईटीला परीक्षांसाठी साडेचार लाख विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. परिक्षेपासूनच विद्यार्थ्यांनी प्रश्नसूची आणि उत्तरसूचीमध्ये तफावत असल्याचा आरोप करत आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोपांनंतरही टीईटी परीक्षेची उत्तरसूची जाहीर करण्यात आली नाही.

त्यातच प्रितीशच्या घरी टीईटीची 50 ओळखपत्रे सापडल्याने या परीक्षेतही घोटाळा झालाय का? असा सवाल उपस्थित उपस्थित होऊ लागला आहे. याची चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांनी आयुक्त तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीनंतरच पोलिसांनी तुकाराम सुपेंना अटक केली आहे. आज तुकाराम सुपेंना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com