पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ...

Savitribai Phule University : यंदा राजकीय पक्षांनी उघडपणे पॅनेल करून उमेदवार रिंगणात उतरविले होते.
Savitribai Phule University Latest New
Savitribai Phule University Latest Newsarkarnama

मीनाक्षी गुरव

पुणे : राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा ठसा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीवरही उमटला आहे. विद्यापीठाच्या अधिसभा नोंदणीकृत पदवीधर गटाच्या निवडणुकीत देखील भाजप पक्षप्रणित विद्यापीठ विकास मंचाने निर्विवाद वर्चस्व मिळवत. महाविकास आघाडीला धक्का दिला आहे.

दरम्यान, या निवडणुकीत पहिल्या फेरीतच १० पैकी आठ जागांवर मंचातर्फे निवडणूक लढविलेले उमेदवार निवडून आले आहेत. महाविकास आघाडीतील पक्षांनी पाठिंबा दिलेल्या पॅनलचा धक्का बसला आहे. (Savitribai Phule University Latest New)

Savitribai Phule University Latest New
गांधी हत्येसाठी काँग्रेस मंत्र्यांच्या मेव्हण्यानेच पिस्तूल पुरवला; सावरकर-गांधींच्या पणतूंमध्ये जुंपली

यंदा राजकीय पक्षांनी उघडपणे पॅनेल करून उमेदवार अधिसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते.त्यामुळे सुरूवातीपासूनच निवडणुकीला राजकीय स्वरूप मिळाले होते.भाजपशी संबंधित आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष या गटातील उमेदवारांचे ‘विद्यापीठ विकास मंच’ हे पॅनल होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महाविकास आघाडीचे सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल, काँग्रेसने पाठिंबा दिलेले छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनल, आदी पक्ष, संघटनांचे एकूण ३७ उमेदवार रिंगणात होते.

विद्यापीठ विकास मंचातर्फे अनुसूचित जमाती (एस.टी) प्रवर्गातून गणपत नांगरे हे १३ हजार ९९५ मतांनी, भटक्या जमाती (एन.टी) प्रवर्गातून विजय सोनवणे हे १४ हजार १०१ मतांनी, अनुसूचित जाती (एस.सी) प्रवर्गातून राहुल पाखरे हे १३ हजार ५१२ मतांनी, तर इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातून सचिन गोर्डे हे १३ हजार ३४२ मतांनी विजयी झाले.

Savitribai Phule University Latest New
संकटात सापडलेल्या राज्यपालांसाठी रामदास आठवले मैदानात; म्हणाले...

महिला प्रवर्गातून बागेश्री मंठाळकर या १५ हजार ६४९ अशा सर्वाधिक मतांनी निवडून आल्या आहेत. खुल्या प्रवर्गात विद्यापीठ विकास मंच आणि सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल यांच्यात अटीतटीची लढत झाली. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधू प्रसेनजीत फडणवीस हे पहिल्या फेरीतच खुल्या प्रवर्गातून चार हजार ४४७ मते मिळवून निवडून आले.

तसेच खुल्या प्रवर्गातून सागर वैद्य हे तीन हजार ७११ मते मिळवीत पहिल्या फेरीत, तर युवराज नरवडे हे तीन हजार ६८६ मते मिळवत दुसऱ्या फेरीत विजयी झाले आहेत. पहिल्या फेरीत विद्यापीठ विकास मंचाचे सात उमेदवार निवडून आले. त्यानंतर खुल्या प्रवर्गातील उर्वरित उमेदवारांच्या निकालासाठी पुढील फेरी सुरू करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती.

Savitribai Phule University Latest New
बैलगाडा शर्यत पुन्हा अडकली कायद्याच्या कचाट्यात; सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी

अधिसभा निवडणुकीत निवडून आलेले उमेदवार (नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघ)

  • विजयी उमेदवार (प्रवर्ग) : मिळालेली एकूण मते

  • प्रसेनजीत फडणवीस (खुला) : ४,४४७

  • सागर वैद्य (खुला) : ३,७११

  • युवराज नरवडे (खुला) : ३,६८६

(खुला)

  • राहुल पाखरे (एससी)  : १३,५१२

  • गणपत नांगरे (एसटी) : १३,९९५

  • विजय सोनवणे (एनटी) : १४,१०१

  • सचिन गोर्डे (ओबीसी) : १३,३४२

  • बागेश्री मंठाळकर (महिला) : १५,६४९

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com