Pune Loksabha Election : 'उद्धव ठाकरे हे खरे गद्दार; शिंदे, बारणे हे खुद्दार', फडणवीसांचा हल्ला अन् कौतुकही

Election Campaign Strategies : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे हे खरे गद्दार असल्याचा हल्लाबोल केला. त्याचवेळी त्यांनी शिंदे हे खुद्दार असल्याचेही सांगितले. मावळमधील महायुतीचे (शिंदे शिवसेना) उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात आला.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Pune LokSabha Election: मावळमधील महायुतीचे (शिंदे शिवसेना) उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा काल (ता.६) पिंपरी-चिंचवडमध्ये (रहाटणी) येथे झाला. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे हे खरे गद्दार असल्याचा हल्लाबोल केला. त्याचवेळी त्यांनी शिंदे हे खुद्दार असल्याचेही सांगितले. Loksabha Election Campaign 2024

फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल पुणे जिल्ह्याचा झंझावाती दौरा केला. त्यात त्यांनी महायुतीचे (अजित पवार राष्ट्रवादी) शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यासाठी सकाळी, तर बारणेंसाठी (Shrirang Barne) दुपारी रहाटणी येथे सभांचा धडाका लावला.

रहाटणी येथे झालेल्या सभेत त्यांनी बारणेंचे प्रतिस्पर्धी ठाकरे शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरे यांनाही लक्ष्य केले. ते चार महिन्यांपूर्वी अजित पवार राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले आहेत. हा संदर्भ पकडून ते कुठल्या शिवसेनेत पैदा झाले आहेत, असा सवाल फडणवीसांनी केला.

शिवसेना (Shivsena) सोडून राज्यातील युती सरकारामध्ये सामील झालेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व त्यांना साथ दिलेले बारणे हे गद्दार असल्याची टीका ठाकरे शिवसेना वरचेवर करीत आहे. हा संदर्भ धरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांशी प्रतारणा करणारे उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार असून त्यांच्या विचारांशी एकनिष्ठ असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार बारणे व त्यांचे सहकारी हे तर खुद्दार आहेत, असा पलटवार फडणवीसांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या सुपरफास्ट इंजिनला मावळची बोगी जोडू,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis
Satara Voting News : जनतेचे प्रश्न सोडवणारा खासदार लोकसभेत पाठवा; श्रीनिवास पाटीलांचे सहकुटुंब मतदान!

फडणवीसांची सभा असल्याने महायुतीतील पक्षांचे उद्योगनगरीतील झाडून सारे नेते या सभेला हजर होते. एकीकडे संपूर्ण जगात लोकप्रिय असलेले नरेंद्र मोदी (Narendra Modi), तर दुसरीकडे 24 पक्षांच्या खिचडीचा राहुल गांधी हा पर्याय आहे. इंडिया आघाडीत वेगवेगळ्या दिशेला जाणारी सगळी इंजिनेच आहेत. त्यामुळे त्यांची गाडी जागेवरच उभी आहे. देशातील प्रत्येक घटकाला मोदींच्या विकासाच्या गाडीत बसायची संधी असून त्याउलट गांधींच्या इंजिनात फक्त सोनिया गांधी व प्रियंका गांधी, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या इंजिनात फक्त सुप्रिया सुळे,तर उद्धव ठाकरे यांच्या इंजिनात फक्त आदित्य ठाकरे यांनाच जागा आहे, असा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला. latest Marathi Political news

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विक्रमी मताधिक्य देण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे. मानापमान बाजूला ठेवून सर्वांनी सामुदायिक जबाबदारी घ्यावी, असे आवाहन फडणवीसांनी यावेळी केले. यापूर्वी महायुतीच्या सभेला गैरहजर राहिलेले मनसेचे स्थानिक नेते यावेळी आवर्जून उपस्थित होते. 'अब की बार, चार सौ पार', 'फिर एक बार, मोदी सरकार', 'नरेंद्र मोदी जिंदाबाद', 'जय श्रीराम, जय जय श्रीराम', 'आप्पा बारणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है' च्या घोषणा देत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बारणे यांच्या 'रेकॉर्ड ब्रेक' विजयाचा एकमुखी निर्धार यावेळी केला.

Devendra Fadnavis
Baramati Lok Sabha Election : निवडणुकीत पैसे वाटल्याचा अजितदादांवर आरोप; म्हणाले, "बँक उघडी असल्याचं.."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com