Mahayuti Melava: मनोमिलनापूर्वीच महायुतीत ठिणगी; पहिल्याच मेळाव्याला 'रासप'ने फिरवली पाठ

Maharashtra Politics:समन्वयकांनी देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता.
Mahayuti Melava
Mahayuti MelavaSarkarnama
Published on
Updated on

Pune News: महायुतीत सहभागी असलेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) तसेच रिपब्लिकन पार्टी अॅाफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेत मेळावा घेण्याचे जाहीर केले आहे. मात्र महायुतीत सहभागी झालेल्या या पक्षांमधील रुसवे फुगवे थांबण्यास तयार नाहीत. आज (रविवारी) सायंकाळी होणाऱ्या या महायुतीच्या मेळाव्यावर आता बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

महाविकास आघाडीच्या विरोधातील व्रजमुठ अधिक कडक करण्यासाठी व आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती अधिक बळकट करण्यासाठी हा मेळावा घेण्यात येत आहे. म्हात्रे पुलाजवळील डी पी रस्त्यावरील शुभारंभ मंगल कार्यालयात मेळावा होणार आहे. यासाठी पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मार्गदर्शन करणार आहेत.

मेळाव्यासाठी तयार करण्यात आलेल्या फ्लेक्सवर काही पक्षांच्या नेत्यांना वेगळे स्थान आणि छोट्या पक्षांच्या नेत्यांचे छोटे फोटो लावण्यात आले होते. त्यामुळे याबाबत यापूर्वी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्यासह अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ही नाराजी व्यक्त केली होती. पदाधिकाऱ्यांची ही सूचना वरिष्ठ पातळीवर पोहोचवण्याची हमी महायुतीतील समन्वयकांनी देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता.

Mahayuti Melava
Chhagan Bhujbal: भुजबळ म्हणाले, ED अधिकाऱ्यांशी बोलावे लागेल; जिल्हा बँक काय भूमिका घेणार?

महायुती आता कोणतेही रुसवे फुगवे राहिलेले नाहीत, असा दावा केला जात होता असे असतानाच आता महायुतीत सहभागी झालेल्या रासपने या मेळाव्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. रासपचे पदाधिकारी हे महायुतीच्या पत्रकार परिषदेपासून विविध बैठकांना हजर होते, मात्र आता या मेळाव्याला हजर राहणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. रासपाची अध्यक्ष महादेव जानकर यांचे भाजप बरोबर असलेले मतभेद लक्षात घेऊन हा बहिष्कार टाकल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. पहिला मेळावा होण्यापूर्वीच महायुती असे रुसवे फुगवे सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रासप पुणे शहर अध्यक्ष बालाजी पवार म्हणाले, "महायुतीच्या मेळाव्यात सहभागी होण्याबद्दल पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्याकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. वरिष्ठ पातळीवर जागांबाबत अद्याप कोणत्याही वाटाघाटी झालेल्या नाहीत, त्यामुळे आम्ही या मेळाव्याला जाणार नाही. फ्लेक्सवर जानकर साहेबांचा फोटो असला तरी आमच्या वरिष्ठांकडून कोणतेही आदेश मिळालेले नाहीत.

महायुतीचे समन्वयक आणि भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी संदीप खर्डेकर म्हणाले, "रासप बरोबर चर्चा सुरू आहे. त्यांची भूमिका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोचवली आहे. महादेव जानकर हे आमचे जुने मित्र आहे, पुढच्या मेळाव्यात ते नक्की सहभागी होतील, यात शंका नाही,"

Mahayuti Melava
Nagar Politics: माजी झाले, तरी फुकट नारळ फोडण्याची हौस जात नाही, तनपुरेंनी कर्डिलेंना डिवचलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com