Devendra Fadnavis,Mangaldas Bandal
Devendra Fadnavis,Mangaldas Bandal Sarkarnama

Devendra Fadnavis News : बांदल - फडणवीस भेट योगायोग की जाणीवपूर्वक ?

Mangaldas Bandal met Devendra Fadnavis : बांदल आणि फडणवीस यांच्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या
Published on

Shirur Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, अनेक मतदारसंघांत उमेदवारांच्या नावांची घोषणादेखील करण्यात आली आहे. राज्याचे विशेष लक्ष लागलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे रिंगणात असून, त्यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले शिवाजीराव आढळराव पाटील निवडणूक लढविणार आहेत, तर तीन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने या मतदारसंघात आपला उमेदवार दिला आहे.

शिरूर (Shirur) लोकसभेसाठी वंचितने पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यापूर्वी बांदल हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. तसेच त्यानंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश करून त्यांनी विधानसभेची निवडणूकदेखील लढविली होती. शिरूर लोकसभेसाठी ते इच्छुक होते. यासाठी काही दिवसांपूर्वी बांदल यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत जाऊन भेटदेखील घेतली होती. शिरूरची जागा महायुतीच्या जागावाटपामध्ये अजित पवार यांच्याकडे असल्याचे फडणवीस यांनी बांदल यांना सांगितले होते.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

Devendra Fadnavis,Mangaldas Bandal
Loksabha Election 2024 : मुश्रीफांचे हेलिकॉप्टर; सुळे म्हणतात, 'बडे लोग, बडी बाते...'

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) हे शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील इंदापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे वंचितचे उमेदवार असलेल्या मंगलदास बांदल यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याचे पाहायला मिळाले. बांदल आणि फडणवीस यांच्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. इंदापूर येथे आल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सोनाईचे प्रमुख दशरथ माने आणि त्यांचे सुपुत्र प्रवीण माने यांची भेट घेतली. माने यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. त्यावेळी मंगलदास बांदलदेखील तेथे उपस्थित असल्याने विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

शिरूर लोकसभे (Loksabha) साठी भाजपकडून मंगलदास बांदल इच्छुक होते. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचीदेखील भेट घेतली होती. वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर होण्याच्या आदल्या दिवशी वडगाव शेरी येथे पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराच्या सभेलादेखील बांदल उपस्थित होते. वंचित आघाडी कायम भाजपला पाठिंबा देत असते, असे आरोप यापूर्वीदेखील वंचित आघाडीवर अनेकदा झाले आहेत. त्यामुळे मंगलदास बांदल आणि फडणवीस यांची झालेली भेट ही योगायोग आहे की, जाणीवपूर्वक अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

R

Devendra Fadnavis,Mangaldas Bandal
Thane Loksabha news : ठाण्याच्या मेळाव्यात अवतरले नरेंद्र मोदी; सभागृहात एकच जल्लोष, पण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com