Maratha Aarakshan : 'मराठा समाजाला चिथावणाऱ्या सदावर्तेंना अटक करा'; मराठा क्रांती मोर्चाचा ठिय्या आंदोलनाचा इशारा

Maratha Kranti Morcha On Gunaratna Sadavarte : छगन भुजबळ यांच्यानंतर आता मराठा क्रांती मोर्चाने आपला मोर्चा गुणरत्न सदावर्तेंकडे वळवला आहे.
Gunratna Sadavarte
Gunratna Sadavarte Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : मराठा समाजाबद्दल खोटे आणि अवमानकारक वक्तव्य करून मराठा- ओबीसी समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्याबद्दल मराठा समाजाच्या वतीने राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना नुकतीच (ता. १२ ऑक्टोबर) कायदेशीर नोटीस बजावण्यात आली. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांच्या परवाच्या (ता. १४ ऑक्टोबर) अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथील रेकॉर्डब्रेक सभेसाठी सात कोटी रुपये घेण्यात आल्याचा आरोप भुजबळांनी केला होता. त्यानंतर जरांगेंच्या अटकेची मागणी करणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्तेंकडे आता मराठा मोर्चाने आपला मोर्चा वळवला आहे. सदावर्तेंविरुद्ध पोलिसांत तक्रार देऊन त्यांच्याच अटकेची मागणी मोर्चाच्या वतीने रविवारी (ता. १५ ऑक्टोबर) करण्यात आली.

Gunratna Sadavarte
Maratha Reservation News : आरक्षणाचे स्वप्न घेऊन परतणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ; कुटुंबाची जबाबदारी समाज घेणार..

मनोज जरांगे-पाटलांची अंतरवाली सराटीतील सभा हिंसक होईल, म्हणून तिला परवानगी न देता जरागेंना अटक करा, अशी मागणी अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांनी छत्रपती संभाजीनगर पोलिस आणि राज्याच्या गृहसचिवांना केली होती. त्यावर सदावर्तेंना त्यांच्या मालकांनी (देवेंद्र फडणवीस) समज द्यावी, असे प्रत्युत्तर जरागेंनी दिले होते. मराठाद्वेष्ट्यांचे चेले सदावर्ते आहेत, अशी तोफ त्यांनी गृहमंत्री व उपमुख्यमंत्री फडणवीसांचे नाव न घेता डागली होती. सदावर्ते हे कुणाचं पिल्लू आहे हे सगळ्यांना माहीत आहे, अशा चेल्यांना मी उत्तर देत नसतो, असेही ते म्हणाले होते.

दरम्यान, जरांगेंची सभा यशस्वी होताच आता मराठा मोर्चाने भुजबळानंतर आपला मोर्चा सदावर्तेंकडे वळवला आहे. राहुल व्यंकटराव यादव (रा. पुनर्वसन सावरगाव, ता. कळंब, जि. धाराशीव) यांनी काल (ता. १५ ऑक्टोबर ) कळंब पोलिस ठाण्यात सदावर्तेंविरुद्ध तक्रार करीत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. न्यूज चॅनलला मुलाखती देऊन मराठा व इतर समाजात तेढ निर्माण करून सदावर्ते हे दंगल घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे त्यात म्हटले आहे.

'गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा दाखल केला नाही, तर... '

मग्रूर, माजलेला मराठा समाज आणि त्याला रॉयल डॉग संबोधून सदावर्तेंनी आमच्या समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. मराठा समाजाला चिथावण्याचे काम ते करीत असून, त्याच्यातून जर भविष्यात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याला सदावर्तेच जबाबदार असतील, असे यादव यांनी या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, आज संध्याकाळपर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर पोलिस ठाण्याबाहेर मराठा मोर्चा ठिय्या आंदोलन करणार त्यानंतर गुन्हा दाखल होईपर्यंत करेल, असा इशारा त्यांनी `सरकारनामा`शी बोलताना थोड्या वेळापूर्वी दिला.

Edited by : Sachin Fulpagare

Gunratna Sadavarte
Manoj Jarange Rally News : जरांगेंचे बंद फेसबुक अकाउंट चोवीस तासांत सुरू...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com