
Pune Political News : अंतरवाली सराटी येथे झालेल्या गोंधळात पोलिसांवरही दगडफेक झाली. त्यात १७-१८ पोलिस जखमी झाले. जिथे पोलिसांवरच हल्ले होतात, तिथे आमदार, खासदार, सामान्य लोकांचे काय होणार. पोलिस आता हतबल झाले आहेत, अशी खंत व्यक्त करत ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळांनी मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराकडे लक्ष वेधले. तसेच पोलिसांबाबत ठोस भूमिका घेण्यास गृहविभाग आणि सरकार कमी पडल्याचे सांगून भुजबळांनी सरकारला घरचा आहेरही दिला.
मराठा समाजातील लोकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण देण्यास भुजबळांनी तीव्र विरोध केला आहे. याबाबत त्यांनी पुणे येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या वेळी भुजबळांना मिळणाऱ्या धमका, टायर जाळून त्यांचे आडवलेले ताफे, याबाबत त्यांनी कॅबिनेट समोर काही भूमिका मांडली का आदी प्रश्न विचारण्यात आले. यावर त्यांनी झालेल्या दगडफेकीनंतर पोलिस हतबल झाले असून, माझ्यावर होणारे हल्ले किरकोळ असल्याचे सांगितले.
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, अंतरवाली सराटी येथे उपोषणकर्ते जरांगे पाटलांना रुग्णालयात नेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर अमानुषपणे दगडफेक झाली. त्यात सुमारे ७० पोलिस उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. तिथे झालेल्या दगडफेकीला उत्तर देण्यासाठीच पोलिसांनी लाठीचार्ज केला. शरीरावर झालेल्या जखमा बुजतील, पण मनावर झालेल्या जखमांचे काय, याला एसपीही जबाबदार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अंतरवाली सराटीत झालेल्या घटनेमुळे एसपींना निलंबित केले गेले. पोलिसांच्या जखमांकडे दुर्लक्ष झाले. यातून पोलिसांचे मनोबल खचले. परिणामी बीडमध्ये झालेल्या हिंसाचारात पोलिसांनी काहीच केले नसल्याचेही भुजबळ म्हणाले. त्यामुळे पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी विश्वास दिला पाहिजे. यामुळेच अंतरवाली सराटीत झालेल्या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.